Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईचे काही टक्के काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी द्या; राष्ट्रवादीची मोदींकडे मागणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स‘ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा पार केला आहे आहे. यानंतर आता विधानसभेत एकच चर्चा रंगी होती कि, या सिनेमाच्या कमाईतील नफ्याचा काही भाग काश्मीरी पंडितांची घरं बांधण्यासाठी द्या, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत म्हटलं होत. यानंतर आता राष्ट्रवादीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत पत्र लिहीत ही मागणी केली आहे. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही मागणी केली आहे. अशाच आशयाचे पत्र या सिनेमाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनाही राष्ट्रवादीच्या वतीने पत्र लिहिण्यात आलं आहे.

या पत्रात लिहिले आहे कि, “आपण काश्मीर फाईल्स चित्रपट हा तसा आपण म्हणत आहात की सत्य परिस्थितीवर आधारीत आहे आणि यात काश्मिरी पंडित यांच्यावर अनन्वीत अत्याचार करुन त्यांना काश्मीर मधून बाहेर काढण्यात आले आहे. या चित्रपटाची प्रसिद्धी खुद्द आपण, भाजपचे खासदार, आमदार, सर्व मंत्री आणि एकूणच भाजप ची सर्व यंत्रणा या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुण लोकांनी जास्तीत जास्त हा चित्रपट पहावा यासाठी आवाहन करत आहे.नुकतंच या चित्रपटाने 200 कोटीहून अधिक जास्त गल्ला जमवला आहे. हि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला माहीत असेलच की 1990 साली काश्मीर पंडित विस्थापित झाले त्यावेळी आपल्या पक्षाने पाठिंबा दिलेले केंद्रात सरकार होते आणि काश्मीर मधील तत्कालीन राज्यपाल ही आपलेच होते. तरीही आपण काश्मीर पंडितांना काही मदत करू शकला नाहीत, मात्र आपण आपल्या मुलाखतीतून हे म्हणत आहात की काश्मीर पंडित यांसाठी काँग्रेसने काहीही केले नाही. जे काही केले ते भाजपने केले, तरी माझी आपल्याकडे मागणी आहे की त्यावेळी काही केले नाही मात्र आता आपण काश्मिर पंडितांना मदत करू शकता.

पुढे, जो काही या चित्रपटातून नफा मिळाला आहे तो लोकांनी पाहिलेल्या या चित्रपटामुळे मिळालेला आहे तरी या नफ्यातील काही टक्के भाग आपण कश्मीर पंडितांच्या पुनर्वसनासाठी (मुलांचे शिक्षण, त्यांची घरे, योग्य आरोग्य सुविधा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनाचा दर्जा उंचावेल अशा सुविधांकरिता) द्यावा, अशी मागणी करत आहे. मला आशा की आपण या मागणीचा नक्की विचार कराल आणि काश्मिरी पंडितांविषयी असणारे आपले प्रेम फक्त चित्रपटातून न दाखवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवाल. माझी ही मागणी आपण नक्कीच पूर्ण कराल ही मला खात्री आहे”, अशी मागणी राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आली आहे.