Take a fresh look at your lifestyle.

अजून द्या पद्मश्री! १९४७ मध्ये भीक आणि २०१४ मध्ये स्वातंत्र्य?; कंगनाच्या वक्तव्यामूळे संतापले भारतीय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिला नुकताच पद्मश्री हा पद्म पुरस्कार जहाल झाला आहे. यानंतर टाईम्स नाऊ समिटमध्ये तिने उपस्थिती दर्शवली होती. या दरम्यान, कंगनाने काही अशी वक्तव्ये केली कि ज्यामुळे तिने सर्व भारतीयांचा रोष ओढवून घेतला असल्याचे पाहायला मिलत आहे. तसे पाहता वाद आणि कंगना हे फार जुने समीकरण आहे. पण हा वाद कदाचित फार उफाळेल असे दिसून येत आहे. कारण या मुलाखती दरम्यान कंगनाने थेट भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मग काय? मर्मावर बोट ठेवणार तर चपराक मिळणारच अश्या पद्धतीच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसत आहेत.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मुलाखतीदरम्यान कंगना म्हणाली की, ‘रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. १९४७ मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळालं आहे.’ यावर मुलाखतकार कंगनाला म्हणाली की, ‘म्हणूनच तुम्हाला लोक भगवा म्हणतात’. यानंतर यावर जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला. मात्र, आता टाळ्यांच्या गडगडाटानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकांचा पाऊस पाहायला मिळतोय.

कंगनाच्या या वक्तव्यानंतर दुखावलेल्या प्रत्येक भारतीयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर जोरदार टीका केली आहे. यात एका नेटकऱ्याने म्हटले की, सोनू सूदने लोकांची मदत केली, त्याच्यावर आयटी धाडी टाकल्या..आणि ही व्यक्ती अशी काहीही बडबड करते तिला पद्मश्री दिला जातो’. तर अन्य एका युजरने लिहिले की, ‘कंगना म्हणाली की १९४७चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले होते.

आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, तिच्याकडून एवढीच अपेक्षा केली जाऊ शकते, त्यांच्या मते, सुभाष/भगत/चंद्रशेखर यांनी काहीही केले नाही. त्रास या प्रकरणावर टाळ्या वाजवणाऱ्यांमुळे होतोय. आज देश इथे उभा आहे.’ याशिवाय अन्य एका युजरने लिहिले की, ‘आमच्या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करणारे सरकार आता असते, तर असे लज्जास्पद विधान करणाऱ्या या महिलेवर आतापर्यंत गुन्हा दाखल झाला असता..’ तर अनेकांनी कंगनाला देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्कारावरचं बोटं ठेवलं आहे. एकंदर काय तर कंगनाला पुन्हा एकदा तिचे वक्तव्य चांगलेच भोवल्याचे दिसत आहे.