Take a fresh look at your lifestyle.

तरुणपिढीला सातारी कंदी पेढे द्या!; बिग बॉस फेम बिचुकलेचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी अगदी राजकीय वर्तुळापासून ते फिल्म इंडस्ट्रीच्या चौकटीपर्यंत कल्ला केला आहे. एकंदरच त्यांनी केलेली विधाने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहेत. काही दिवसांपासून ते बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर जोरदार टीका करत आहेत. त्याच दरम्यान त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानमंत्र देण्याचे काम केले आहे.

अभिजीत बिचुकलेने माध्यमांशी बोलताना असे काही सल्ल्याचे सूर लावले आहेत कि ते ऐकून कदाचित सीएम साहेब विचार करू शकतात. अभिजित बिचुकले म्हणाले, उद्धवदादा तरूणपिढीला व्यसनाधीन करू नका. तुम्ही किराणामालाच्या दुकानामध्ये आणि मॉल्समध्ये जर वाइन विकणार असाल तर याच मी कधीही समर्थन करणार नाही. जर तुम्हाला सगळीकडे काही विकायचं असेल तर अभिजीत बिचुकले अॅण्ड सन्स स्वीट्सचे सातारी कंदी पेढे आहेत ते द्या, कारण ते दुधाचे आहेत आणि त्या दुधातून माणसांना ताकद मिळेल आणि येणारी पिढी सुद्रुढ होईल.

दरम्यान, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सलमान खानवर आगपाखड केली. सलमान खान हा काही भाई नाही. त्याची भाई म्हणवून घ्यायची लायकी नाही असे म्हणत त्यांनी सलमान खानवर सडकून टीका केली. शिवाय तो भाई असेल ना तर मी दादा आहे हे त्याने विसरू नये. असले १०० सलमान मी माझी गल्ली झाडायला ठेवेन असेही त्याने म्हटले आहे. बिग बॉमधून बाहेर पडल्यापासून बिचुकले हात धुवून सलमान खानच्या मागे लागल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सतत सलमान खानवर कडक शब्दांत टीका करत आहे. मात्र अद्याप सलमान खानने यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे समजलेले नाही.