Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस मराठीच्या घरात होणार ग्लॅमरस वाईल्ड कार्ड एंट्री; जाणून घ्या कोण आहे हि अभिनेत्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आणि वादग्रस्त शो म्हणून ज्याची ख्याती आहे असा एकच शो म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या बिग बॉस हिंदीचा १५वा तर बिग बॉस मराठी ३ रा सीजन सुरु आहे. दोन्हीही शो प्रेक्षकांची पसंती मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीमध्ये अभिनेता आदिश वैद्यची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. पण कमी वोटिंगमुळे अवघ्या ३ आठवड्यात तो घराबाहेर गेला. पण यानंतर आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातील समीकरणं बदलण्यासाठी नवी वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री नीता शेट्टीचे बिग बॉसच्या घरात जोरदार आगमन होणार आहे. सध्या कलर्स मराठीच्या इंस्टाग्रामवर तिच्या एंट्रीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे पण यात ती पाठमोरी असल्यामुळे तिचा चेहरा दिसत नाही आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री नीता शेट्टी बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री करीत डान्स करतांना दिसत आहे. मात्र तिला पाठमोरी दाखवण्यात आली असली तरीही प्रेक्षकांनी मात्र तिला ओळखले आहे. आता घरामध्ये अभिनेत्री नीता शेट्टी येणार म्हणजे ग्लॅमर आणि सौंदर्य दोन्ही खुलणार.

आता येईल खरोखर ‘बिग बॉस मध्ये रंगत कारण प्रत्येकासाठी प्रतिस्पर्धक बनून स्ट्रॉंग गर्ल नीट येतेय. त्यामुळे हा शो पाहणे आत्ता आणखीच मनोरंजक होणार आहे. बिग बॉस मराठीचं घर हे सध्या स्पर्धकांच्या चुटुक पुतुक वाद विवादांनी दणाणून गेलं आहे. रोज विविध कारणांवरून या स्पर्धकांमध्ये खटके उडतात. पण आता नीता आली कि या शोची सगळी गणितं एकाचवेळी पलटी मारणार एवढं नक्की!

बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क झाला. दरम्यान स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांना कॅप्टन पदाचे उमेदवार घोषित केले होते. यात दोघींमध्ये कडी टक्कर पाहायला मिळाली. पण तृप्ती देसाईंवर स्नेहा वाघ भारी पडली आणि स्नेहा झाली घराची नवी कॅप्टन. सध्या घरात दोन ग्रुप आहेत. पण आता आपसातच हे सदस्य अविश्वास दाखवत आहेत. मीरा-गायत्रीच्या संभाषणावरून हे समजते कि आता घरात कुणीच कुणाचं नाही. तर दुसरीकडे विकास-विशालमधील वाद वाढत आहेत. अशातच आता घरामध्ये नव्या सदस्याची एन्ट्री म्हणजे वातावरण कुल होणार का हॉट? हे पाहायला मजा येणार आहे.