Take a fresh look at your lifestyle.

‘पाकिस्तानात जा मग कळेल’; भारतीय क्रिक्रेटर्सवर टीका करणाऱ्यांचा हिंदुस्थानी भाऊकडून समाचार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच T20 वर्ल्डकप २०२१ दरम्यान भारत – पाकिस्तान यांचा जोरदार सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यानंतर पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव या एका नाण्याच्या दोन बाजूचं भासल्या. दरम्यान पाकिस्तानच्या विजयावर अनेक ठिकाणी आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले. हे पाहून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला हिंदुस्थानी भाऊ चांगलाच संतापला आणि त्याने या प्रत्येकाची चांगली खरडपट्टी काढली. इतकेच नव्हे तर भारतीय संघाच्या पराभवाचा आनंद साजरा करत पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या एका व्यक्तीविरोधात खार पोलिस स्थानकात हिंदुस्थानी भाऊने गुन्हा दाखल केला आहे.

T20 वर्ल्डकप २०२१ भारत – पाकिस्तान सामना झाला आणि या सामन्यादरम्यान भारताचा पराभव झाला. पण यावेळी भारतात अनेक ठिकाणी भारताच्या पराभवानंतर काहींनी अगदी जोरजोरात ढोल वाजवून, फटाके फोडून जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले. अशीच आणखी एक विचित्र बाब म्हणजे, मालवणीमधील हसन कोटी या व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यामध्ये भारतीय क्रिक्रेटर्सवर सडकून टीका केली होती. दरम्यान पाकिस्तानला पाठिंबा असून मुंबई पोलीस आपल्याला काहीही करू शकत नाही असं तो म्हणाला. मग काय? या व्यक्ती विरोधात हिंदुस्थानी भाऊने थेट खार पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे.

याच दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना हिंदुस्थानी भाऊ जाम भडकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी माध्यमांशी बोलताना हिंदुस्थानी भाऊ म्हणाले, “याच देशात राहून, याच देशाचं खाऊन जर पाकिस्तानचं कौतुक करत असाल तर पाकिस्तानमध्ये जा, या देशात तुमचं काय काम आहे. ही लोकं पाकिस्तानचा विजय झाला म्हणून खूश झाली, नसून यांना भारताच्या पराजयाचा जास्त आनंद झाला आहे. अनेक ठिकाणी या लोकांनी फटाके फोडले, मिठाई वाटली. या लोकांना वेळेवर उत्तर देणं गरजेचं आहे.” सर्वांनी एकत्र येवून यांच्यावर कारवाई करण गरजेचे आहे.

याशिवाय सोशल मीडियावर अनेकांनी भारतीय क्रिकेटर्सवर अर्वाच्य भाषेत टीका केल्याचे पाहून भाऊने यांचीही शाळा लगावत, …पाकिस्तानात जा मग कळेल असे म्हटले आहे.