Take a fresh look at your lifestyle.

‘जोकर’साठी जॉकयीन फिनिक्सला गोल्डन ग्लोब तर ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

'प्रियांका आणि निक'ने केले प्रेझेंटेशन

टीम, हॅलो बॉलिवूड । जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाण्याऱ्या ७७व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचं वितरण रविवारी करण्यात आलं. या वेळी हॉलिवूडच्या त्याच प्रसिद्ध कलाकारांनी पुरस्कारांमध्ये बाजी मारली. सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिक जॉकयीन फिनिक्स यांना जोकर या चित्रपटासाठी मिळालं.

जोकर हा २०१९ सालातील सगळ्यात जास्तं चर्चिला जाणारा चित्रपट होता. जॉकयीनच्या खिळवून ठेवणाऱ्या अभिनयासाठी आणि उत्कृष्ट कथानकासाठी हे पारितोषिक देण्यात आलं.

सर्वकृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीमध्ये रिंनी झेल्वेगेर हिला सर्वकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. सॅम मेंडीसच्या ‘१९१७’ या चित्रपटाला उत्कृष्ट नाट्यकृती म्हणून गौरवण्यात आलं. तर ‘वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड’ या संगीत आणि करमणूकप्रधान चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाने गौरवण्यात आलं.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध सहाय्यक अभिनेत्याचाचा पुरस्कार ब्रॅड पिटला मिळाला. यासोबतच एलेन डीजेनेरेस आणि लॉरेन डे यांनासुद्धा पुरस्कार देण्यात आला आहे.