Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर !!! रिलायन्स लाँच करणार 5G नेटवर्क

मुंबई । रिलायन्स, हि कंपनी भारत आणि भारतीय लोकांसाठी तसेच नव्या उत्पादनांना विकसित करण्यासाठी पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा समावेश असलेले ५g असलेलं नेटवर्क लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा आणि मेड इन इंडिया या गोष्टींचा दाखला देत जिओ ने प्रयत्न केला आहे. तसेच नवीन स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मुकेश अंबानी यांनी संगितले. या नेटवर्क मध्ये संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या नेटवर्क च्या माध्यमातून जगाला डिजिटल तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवलं गेलं आहे. रिलायन्स तर्फे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना याबाबतची माहिती देण्यात आली.

रिलायन्स हि आतापर्यंत सर्वात जास्त GST भरणारी कंपनी आहे. जवळपास ६९ हजार ३७२ कोटी रूपये GST भरणारी हि कंपनी असल्याचं अंबानी म्हणाले. सेमी कंडक्टर इंडस्ट्रिजमधील दिग्गज इंटेल आणि क्वालकॉम डिजिटल हे इकोसिस्टमचे महत्वाचा भाग मानला जातो.रिलायन्स हे भारत आणि भारतीयांसाठी नव्या उत्पादनांना विकसित करण्यासाठी इंटेल आणि क्वालकॉम डिजिटल या कंपनी सोबत काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

करोना व्हायरसचं हे आपल्यासमोर असलेलं सर्वात मोठं संकट आहे. आणि त्याच्यावर मात करत जगणे हे त्याहून मोठं आव्हान आहे. परंतु भारत आणि संपूर्ण जग या संकटातून लवकरच बाहेर पडेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. “जिओ मीट हे क्लाउड बेस्ड व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अँप आहे. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत जिओ प्लॅटफॉर्म टीमनं हे अँप तयार केलं. हे अँप रिलिज केल्यानंतर जवळपास ५० लाख ग्राहकांनी ते डाऊनलोड केलं, 5G नेटवर्कसाठी आवश्यक असणारी परवाने देण्यास सरकारने सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी जिओ सज्ज आहे,” मुकेश अंबानी म्हणाले.

Comments are closed.