Take a fresh look at your lifestyle.

अंकुश चौधरीच्या लॉकडाऊनमधल्या ‘लकडाऊनची चर्चा’; नेटकऱ्यांकडून पोस्टरला चांगला प्रतिसाद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बऱ्याच दिवसांनंतर मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी आपल्या लाडक्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा धमाका घेऊन येत आहे. गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीने सर्वाना घाईला आणले असताना प्रत्येकाने जगण्यासाठी केलेली धडपड जो तो जाणतो. अश्या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपल्या संसाराचा गाडा मोठ्या हिंमतीने ओढला तर अनेकांनी संसाराला लॉकडाउनच्या कृपेने सुरुवात केली. अशीच थोडी गोड, थोडी आपलीशी वाटणारी लॉकडाऊन कथा घेऊन संतोष रामदास मांजरेकर यांनी आपले मनोरंजन करायचे पक्के ठरवले आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आणि प्रेक्षकांची आतुरता वाढली.

गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी ३ च्या मंचावर चावडीदरम्यान अभिनेता अंकुश चौधरीने हजेरी लावत आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. दरम्यान महेश मांजरेकर यांच्या हातून पोस्टर ओपनिंग झालं. या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर जरी महेश मांजरेकर यांचे चुलत बंधू असले तरीही संतोष यांनी स्वतःचे अस्तित्व स्वतः तयार केले आहे असे महेश यांनी आवर्जून सांगणे पसंत केले. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

चित्रपटाचे पोस्टर ङ्कसूहनें आपल्या सोशल मीडियावर देखील शेअर केले आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर त्यात दिसणारे अंकुश आणि प्राजक्ता हे मुंडावळ्या बांधलेलं नवविवाहित जोडप असेल असे वाटते. जे एकमेकांकडे टक लावून पाहत आहेत. हे पोस्टर शेअर करताना अंकुशने लिहिले, “टेन्शनला करूया थोडं निगेटिव्ह, कारण ‘वासू-सपना’ सोबत येतोय फुलऑन फॅमिलीचा *लकडाऊन बी पॉझिटीव्ह* २८ जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात #luckdownbepositive”

या चित्रपटाचे दिगर्शक संतोष रामदास मांजरेकर यांचा ‘लक डाउन’ हा पहिला चित्रपट आहे. ज्याचे शूटिंग २०२० सालामध्ये सुरू केले होते. संतोष मांजरेकर दिग्दर्शित, अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी अभिनीत आगामी मराठी चित्रपट ‘लक डाउन’ २८ जानेवारी २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षकावरून एकंदरच कुणीही अंदाज लावू शकतो की हा चित्रपट कोविड परिस्थितीत लॉकडाऊनवर आधारित असावा. शिवाय आता उघड आहे कि लवकरच चित्रपटगृहात लकडाऊन पाहायला प्रेक्षकांची गर्दी होणार आहे.