Take a fresh look at your lifestyle.

अलविदा बप्पी दा! मुलाने मुखाग्नी दिल्यानंतर पिता पंचतत्वात विलीन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत विश्वाने गेल्या काही दिवसात इतके धक्के सहन केले आहेत कि आता एका दुःखातून बाहेर पडायचं म्हटलं कि दुसरं दुःख येऊन ठाकलेलं दिसत आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी सुप्रसिद्ध बॉलिवूड पॉप सिंगर बप्पी लहरी यांचे निधन झाले. यानंतर संपूर्ण कला विश्वासह अगदी क्रीडा क्षेत्रातही दुःखाची लाट उसळल्याचे पहायला मिळाले. यानंतर गुरुवारी बप्पी लहरी यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडले.

बप्पीदांचे निधन झाल्यानंतर बुधवारी त्यांचे पार्थिव घरी नेण्यात आले होते मात्र अंत्यसंस्कार केले नव्हते. याचे कारण म्हणजे, बप्पी दा यांचा मुलगा बप्पा परदेशातून आला नव्हता. त्यामुळे पित्याच्या पार्थिवाने मृत्यनंतर तब्बल २ दिवस वाट पहिली आणि त्यानंतर मुलाच्या हातून मुखाग्नी घेऊन बप्पी दा पंच तत्त्वात विलीन झाले.

बप्पी लहिरी यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. बप्पीदांचे निधन झाल्यानंतर बुधवारीच त्यांचे पार्थिव घरी घेऊन गेले होते, मात्र अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हेत, कारण बप्पीदांचा मुलगा बप्पा परदेशातून आला नव्हता आला नव्हता. बप्पीदांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज कलाकार उपस्थित होते. यानंतर त्यांच्या अंत्य संस्कारासाठीदेखील बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार, संगीतकार, गायक उपस्थित होते.

बप्पीदांचा मुलगा बप्पा परदेशातून आल्यानंतर त्याने साश्रू नयनांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलॆ. आपल्या वडिलांना निरोप देताना बप्पा यांची स्थिती अंत्यंत भावनिक झाली होती. तर बप्पी दा यांच्या पत्नीची अवस्था अत्यंत वाईट दिसून आली. संगीतकार आणि गायक असलेल्या बप्पी दा यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे पार्थिव फुलांनी सजवले होते.

मात्र रसिकांच्या मनात बप्पी दा यांची प्रतिमा काळ्या गॉगलसह स्मरणात राहील म्हणून तो गॉगल त्यांच्या अंत्ययात्रेतदेखील त्यांच्या डोळ्यावर होता. बप्पी दा यांच्या अंत्यविधीसाठी अलका याज्ञिक, संगीतकार भूषण कुमार, अनुराधा पौडवाल, शान असे संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी होते.