Take a fresh look at your lifestyle.

गुगल टॉप- 10 सर्चच्या यादीत आर्यन खान आणि शहनाज गिलचा समावेश  

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चालू वर्ष २०२१ संपत आले आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीही अनेक सेलिब्रिटी विविध कारणाने प्रसिद्ध झाले. गुगल दरवर्षी अशा लोकांची एक यादी प्रसिद्ध करतो. ज्यामध्ये वर्षभरात सर्वाधिक शोधले गेलेल्या व्यक्तींच्या नावाचा समावेश असतो. यावर्षी गुगलने सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली असून यात जगभरातील सेलिब्रिटी आहेत. गुगलने जाहीर केलेल्या यादीत अशा दोन नावांचा समावेश आहे जे मोठे सेलिब्रिटी नसूनसुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले आहेत. 

 

 

या वर्षी सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत भारतीयांमध्ये पहिले नाव बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि दुसरे नाव टीव्ही अभिनेत्री शहनाज गिलचे आहे. आर्यन खान या यादीत अव्वल भारतीय आहे कारण तो या वर्षीचा सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटी ठरला होता. जेव्हापासून तो ड्रग्ज प्रकरणात पकडला गेला तेव्हापासून त्याचे नाव गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. या प्रकरणात आर्यन खानला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले होते. आता तो तुरुंगातून बाहेर आला असला तरी त्याच्यावर खटला सुरूच आहे.

 

शहनाज गिल ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, पण या वर्षी दुसऱ्या कारणांमुळे चर्चेत राहिली. शहनाज गिल तिचा प्रियकर अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनानंतर चर्चेत आली होती. त्याच्या मृत्यूनंतर ती दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर आली आणि तिने सिद्धार्थ शुक्लाच्या श्रद्धांजलीचा व्हिडिओ शेअर केला. त्याच वर्षी शहनाजचा पहिला पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’ देखील प्रदर्शित झाला होता जो खूप गाजला होता. या चित्रपटात शहनाज गिलसोबत दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकेत होता.