Take a fresh look at your lifestyle.

त्याच्याकडे ड्रग्ज नव्हतेच..?; ड्रग्जप्रकरणी आर्यनला NCB’कडून क्लीनचिट मिळताच चर्चांना उधाण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षी अत्याधिक गाजलेल्या प्रकारणांपैकी एक म्हणजे मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण. या प्रकरणात बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा समावेश होता. यासाठी आर्यन खानने बरेच दिवस NCB च्या कस्टडीचा पाहुणचार घेतला होता. यानंतर कोर्टाने त्याला नियम आणि अटींसह जामीन मंजूर केला आणि या प्रकरणावर काहीशी चर्चा थांबली. पण यानंतर मधल्या काळात आर्यन हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं NCB च्या प्रमुखांनी स्पष्टीकरण दिलं होत. यानंतर आज चक्क NCB’ने आर्यन खान याला या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणातून क्लीनचिटच देऊन टाकलीये. यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रश्नांवर जोर दिलाय.

एकीकडे NCB’ने शाहरुखचा मुलगा आर्यन खाल याला मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून पूर्ण क्लीनचिट दिली आहे. ज्यामुळे शाहरुखच्या कुटुंबात आणि मुख्य म्हणजे त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच आनंदाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर विविध प्रश्नांचा भडीमार केलाय. काहींना प्रश्न पडलाय कि खरंच आर्यन या प्रकरणाचा एक भाग नाही तर मग त्याला अटक का केली होती..? तर काहींना प्रश्न पडलाय कि, त्यावेळी आर्यनवर कारवाई करणारे समीर वानखेडे आता चुकीच्या तपासासाठी पुरते अडकणार का काय..? तर काहींनी आर्यन पूर्णपणे केसमधून बाहेर झाला का..? असे विविध प्रश्न विचारले आहेत

हे प्रकरण २ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झाले. या दिवशी मुंबईत कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरु असल्याची माहिती NCB ला मिळाली होती. त्यावेळी क्रूझवर जवळपास १८०० लोक होते. यानंतर क्रूझवर छापा टाकत NCB ने तडक कारवाई करीत २० जणांना ताब्यात घेतले . ज्यामध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट सामील होता. दरम्यान आर्यनविरोधात पुराव्याअभावी गुन्हा दाखल होणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.