Take a fresh look at your lifestyle.

ग्रेट भेट विथ महाराष्ट्र CM; मुख्यमंत्र्यांच्या भेटीने हर्षली प्राजक्ता माळी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. ती नेहमीच काही ना काही पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष ओढून घेत असते. यानंतर आता प्राजक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ता माळी ही सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या शोची संपूर्ण टीम ‘माझा पुरस्कार’ सोहळ्यासाठी वर्षा बंगल्यावर गेली होती. त्यावेळी प्राजक्तासह इतर कलाकारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो कलाकारांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे फोटो शेअर करीत आपला हर्ष अर्थात आनंद व्यक्त केला आहे. प्राजक्ताने फोटो शेअर करत लिहिले की, ‘ग्रेट भेट! काल माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. तिही ‘वर्षा’वर. काल साहेबांच्या हस्ते हास्यजत्रेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. धन्यावाद मुळे काका. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. व्यस्त वेळापत्रकातून सबंध १ तास आम्हाला दिल्याबद्दल, मनापासून कौतुक करून उत्साह वाढविल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद’.या कॅप्शनमध्ये प्राजक्ता माळीने हॅशटॅग ग्रेट भेट आणि हॅशटॅग ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ असे लिहिले आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कारा’साठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांची अर्थात संपूर्ण टीमची निवड करण्यात आली होती. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण वर्षा बंगल्यावर करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर हे मान्यवर हजर होते. या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाकारांचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहित केले आहे.