Take a fresh look at your lifestyle.

शाब्बास सोनू सूद!!भाजी विकणाऱ्या इंजिनीयर मुलीला दिली नोकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गरिबांसाठी ‘संकटमोचक’ म्हणून समोर येऊ लागला. सोनू नेहमीच लॉकडाउनचा फटका बसलेल्या लोकांना मदत करताना दिसत आहे. अलीकडेच त्याने आंध्रप्रदेशमधील एका गरीब शेतकरी कुटुंबाला ट्रॅक्टर भेट म्हणून दिला आहे. आता सोनू सूदने लॉकडाउनमध्ये नोकरी गमावणाऱ्या एका तरुणीला मदत केली असल्याचे समोर आले आहे.

एका ट्विटर यूजरने सोनू सूदकडे मदत मागितली होती. त्याने ट्विटमध्ये सोनू सूद सर नमस्कार, ही शारदा आहे. जी एक इंजिनियर आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिची नोकरी गेली आहे. पण नोकरी गेल्यावरही ती खचून गेलेली नाही. तिने घर खर्चासाठी भाजी विक्रिचा व्यवसाय सुरु केला आहे. कृपयाला तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तिची मदत करा असे म्हटले.

सोनू सूदने यूजरच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. ‘माझ्या अधिकाऱ्यांनी तिची भेट घेतली आहे. तिचा नोकरीसाठी इंटरव्ह्यू घेण्यात आला आहे. तिला जॉब लेटरीही पाठवण्यात आले आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

लॉकडाउनमध्ये सोनू सूदने मजदूर कामगारांना आपापल्या घरी पोहोचवण्यास मदत केली. तो आणि त्याची संपूर्ण टीम कामगारांची मदत करत होते. तसेच काही दिवसांपूर्वी जॉर्जियामध्ये अडकलेल्या ५० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सोनू सूद मदत करत असल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.