Take a fresh look at your lifestyle.

STOP RAPING US: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अर्धनग्न युक्रेनियन महिलेचा रशियाविरुद्ध आक्रोश

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक अनपेक्षित घटना घडली जिची साक्ष संपूर्ण कान्स नगरी देतेय. या घटनेचे साक्षीदार होणे अनेकांसाठी अत्यंत भावनिक ठरले आहे. त्याचे झाले असे कि, एका युक्रेनियन महिलेने शुक्रवारी युक्रेनियातील महिलांवर झालेल्या बलात्काराच्या विरोधात अर्धनग्न होऊन रेड कार्पेट हादरवला आहे. या महिलेने युक्रेनियन ध्वजाच्या रंगात स्वतःला रंगवले आणि छातीवर तसेच ओटीपोटावर लिहिले होते कि, “आमच्यावर बलात्कार करणे थांबवा”. हि बाब अनेकांच्या मनाला लागली आणि कित्येकांचे डोळे तिचा आक्रोश पाहून पाणावले होते.

हि महिला एक युक्रेनियन महिला आहे. या महिलेने अंगावर निळा ऑइल पेंट फासला होता. तसेच लाल रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केले होते. छाती उघडी आणि रंग फासून त्यावर स्टॉप रॅपिंग अस असे लिहिले होते. ती एखाद्या आंदोलकाप्रमाणे धावत आली आणि तिला उपस्थित सिक्युरिटीने झाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिला गुडघ्यावर बसविण्याचा प्रयत्न केला जात असताना ती पँपराझींसमोर किंचाळत आपला आक्रोश व्यक्त करीत होती. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरु आहे. ज्यामध्ये रशिया युक्रेनवर सतत हल्ले करत युक्रेनचा नामोनिशाण हटवित आहे. दरम्यान रशियाकडून युक्रेनियन महिलांवर होणार अत्याचार हा कुणाच्याही आत्म्याला मारून टाकेल इतका भीषण आहे. याच त्रासाला आणि जाचाला वैतागून या महिलेने हे कृत्य केले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल अत्यंत मोठा आणि प्रतिष्ठित असा सोहळा आहे. या सोहळ्यातील हि घटना अतिशय मन हेलावून टाकणारी होती. त्या महिलेचा आक्रोश इतका भीषण होता कि रशियाला लाज वाटली असेल.

यंदाचा Cannes Film Festival मोठ्या दिमाखात फ्रान्समध्ये सुरु झाला पण या घटनेने संपूर्ण परिस्थिती बदलली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीने रंगलेल्या कान्स मध्ये या महिलेने हंबरडा फोडला आणि तिच्या आक्रोशानं सारे निःशब्द झाले. त्या युक्रेनियन महिलेचा अवतार पाहून सारेच हैराण झाले. तिचा तो आक्रोश युक्रेनमध्ये महिलांवर सुरु असलेल्या अत्याचाराचा संदेश घेऊन आला होता आणि आमच्यावरील बलात्कार थांबवा असं ती बेंबीच्या देठातून सांगत होती. तिला रेडकार्पेटवर पाहताच तिथल्या महिल्या सुरक्षारक्षकांनी पुढे येत सर्वप्रथम कपड्यांनी तिचं शरीर झाकलं अन् तिला तेथून बाहेर नेण्यात आलं. तिचा आक्रोश तिची तळमळ तिच्या वेदना पाहून अनेकांचा उर भरला होता आणि अनेकांचे डोळे पाणावले होते.