Take a fresh look at your lifestyle.

सोबतीची दशकपूर्ती; आयुष्यातला सर्वात चांगला निर्णय म्हणत प्रियाची उमेशसाठी खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमधील हटके आणि क्लास असे गोड कपल म्हणजे प्रिया – उमेश. या जोडीने अगदी रिल ते रिअल प्रेक्षकांवर जादू केली आहे. ‘आणि काय हवं’च्या माध्यमातून जुई आणि साकेत बनून त्यांनी संसाराच्या महासागरात आनंदाने कसे जहाज तारायचे हे शिकवले. तर खऱ्या खुऱ्या आयुष्यात हि जोडी अगदी तशीच अवली आहे असे अनेकांनी सांगितले. ही जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपले प्रेम व्यक्त करत असते. आता नुकतच यांच्या लग्नाला दशक पूर्ण झालंय म्हटल्यावर खास पोस्ट नको का? तर याच निमित्ताने प्रियाने त्यांच्या लग्नातील एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघेही एकमेकांसाठी खास उखाणा घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ प्रियाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. प्रिया आणि उमेश यांनी ६ ऑक्टोबर २०११ साली एकमेकांसोबत आयुष्यभराची गाठ बांधली आणि हा व्हिडीओ यांच्या लग्नातीलच आहे. हि एक अशी आठवण आहे ज्यात दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहेत आणि आजही ते एकमेकांसोबत तितकेच आनंदी व समाधानी दिसतात.

या व्हिडिओमध्ये उमेश आणि प्रिया एकामागे एक जबर उखाणे घेताना दिसत आहेत. उमेश प्रियासाठी उखाणा घेत म्हणतो, “कांती जिची सुरेख, रुप जिचे अलवार.. प्रिया माझी रत्नजडीत तलवार”. हा उखाणा ऐकल्यानंतर सारे हसतात आणि पुढे प्रियादेखील उमेशसाठी उखाणा घेते. “सारेगमपच्या सुरांचा लागलाय नवा साज.. उमेश माझा जुनाच गडी पण नवं माझं राज. या व्हिडीओसह प्रियाने कॅप्शनमध्ये लिहिले कि, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस! माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय! आमच्या लग्नातील सर्वोत्तम क्षण! श्री कामत, एक दशक पूर्ण; कायमचे सोबती! मी तुझ्यावर दररोज अधिकाधिक प्रेम करेन!

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

प्रिया आणि उमेशने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या दुसर्‍या सीझनसाठी एकत्र शूटिंग केले होते. यानंतर त्याच्या दुसऱ्या पर्वाही विशेष पसंती मिळाली. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी ते टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते आणि यानंतर ‘..आणि काय हवं?’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले. तर, प्रियाची ही दुसरी सीरीज होती.