Take a fresh look at your lifestyle.

हैप्पी बर्थडे अनुष्का शर्मा; मिस शर्मा ते मिसेस कोहली, एक अविस्मरणीय प्रवास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक उत्तम अभिनेत्री ते चित्रपट निर्माती, मॉडेल, पत्नी आणि आई अशा अनेक खऱ्या खुऱ्या आयुष्यातील भूमिका जबाबदारीनीशी पार पाडणारी अनुष्का शर्मा आज आपला ३३वा वाढदिवस साजरा करतेय. प्रत्येक वेळी आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडण्यात अनुष्काने कधीच आणि कोणतेच कारण दिले नाही. चित्रपट विश्वातील कारकिर्दीसोबत अनुष्काने तिच्या खाजगी जीवनाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. अशा या अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते अनेक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद देत आहेत.

अनुष्का सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत असते. कधी तिच्या फोटोंमुळे तर कधी तिच्या जीवनातील एखाद्या प्रसंगामुळे तर कधी तिच्या चिमुकल्या लेकीच्या निमित्ताने ती सोशल मीडिया गाजवत असते. अनुष्काच्या जीवनात अनेक खास आणि अनोखे क्षण आले असतील मात्र त्या खास क्षणांपैकी एक म्हणजे तिचा विवाहसोहळा.

भारतीय क्रिकेट संघात आपली वेगळी अशी ओळख निर्माण करत जागतिक स्तरावरही नावाजलेल्या विराट कोहलीसोबत अनुष्काने लग्न गाठबांधली आणि झाली मिसेस कोहली. इटलीमध्ये अतिशय खाजगी सोहळ्यात या दोघांनीही एकमेकांसोबत सहप्रवासाची सुरुवात केली. या सोहळ्यातील अनेक छायाचित्र आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ज्यानंतर समोर आली विरुष्काच्या ‘वेडिंग फिल्म’ची एक झलक.

विराटने माय वाईफ… माझी पत्नी… असं म्हणत अनुष्काचा पहिल्यांदाच उल्लेख केला तेव्हाचा क्षण या व्हिडीओमध्ये साऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो. काल परवापर्यंत मी एक लहान मुलगा होतो आणि आता थेट माझी पत्नी… असं म्हणताना विराटच्या चेहऱ्यावरील आणि त्याच्या मनातील भाव खूप काही सांगून जातात. जीवनात आपल्या जोडीदाराच्या येण्यानं होणारा आनंद, त्यातही ज्याच्यावर प्रेम केलं त्याच व्यक्तीसोबत आयुष्यभराचा प्रवास सुरु करतानाचं कुतूहल, उत्सुकता आणि काहीसं दडपण विराट आणि अनुष्कालादेखील नक्कीच आले असेल हे हा व्हिडीओ पाहताना लक्षात येतं.