Take a fresh look at your lifestyle.

अंशूच्या अन्वीला हॅपी बर्थडे; फेसबुकच्या माध्यमातून बाबाने लेकीला दिल्या गोड शुभेच्छा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता अंशुमन विचारे हा त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेच. पण त्याची लेक अन्विसुद्धा काही कमी नाही. बाबाच्या पाऊलावर पाऊल ठेऊन अन्वीनेही कमाल केली आहे. असं म्हणायला हरकत नाही कि, अन्वीने अख्खा लॉकडाऊन गाजवलाय. तिचे एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर बघता बघता कमाल व्हायरल झाले आणि अंशूची लोकसुद्धा सेलिब्रिटी झाली. आज या चिमुकल्या अन्वीचा वाढदिवस आहे. आता लेकीचा वाढदिवस कोणत्याबापाची खास नसतो. तसाच आजचा दिवस अंशुमानसाठीसुद्धा खास आहे. त्याने आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून एक भारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने बनविला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्या आहेत. शिवाय त्याच्या सहकलाकार मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनीदेखील बनविला खूप आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अंशुमन विचारे याने आपल्या फेसबुकच्या माध्यमातून लेकीला शुभेच्छा देताना लिहिले कि, आयुष्य खूप सुंदर आहे असं म्हणतात । पण आयुष्य म्हणजे स्वर्ग असतो हे मला आणि पल्लविला तुझ्या येण्यामुळे अनुभवता आलं । जे जे तुला हवंय ते ते सगळं मिळणारच आहे । तुझ्या बाबाची आणि आईची फक्त एवढीच इच्छा आहे ते सगळं इतरांबरोबर तू वाटत राहशील आणी तरीही तुझी ओंजळ भरलेलीच राहो हीच आज तुझ्या वाढदिवसानिमित्त दत्त गुरुं चरणी प्रार्थना । हॅप्पी बर्थडे अन्वी बाळा । खुप खुप प्रेम तुला आम्हा दोघांकडून ।

अंशुमनच्या चिमुकल्या अन्वीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. तिच्या व्हिडीओला सोशल मीडियावर असंख्य लाइक्स व कमेंट्स मिळतात. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अंशुमन जेवढा लोकप्रिय आहे, तेवढीच त्याच्या मुलीची लोकप्रियता आहे. एकांकिकांमधून घडलेल्या अंशुमनने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय. ‘श्वास’, ‘पोश्टर बॉईज’, ‘विठ्ठला शपथ’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय.