हॅपी बर्थडे बिग बी! ट्रोलिंगनंतर महानायकाने घेतला मोठा निर्णय; ब्लॉगवर दिली विशेष माहिती
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे बिग बी अर्थात महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज ७९’वा वाढदिवस आहे. यामुळे त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांकडून तसेच मनोरंजन सिने सृष्टीतून अमिताभ बच्चन यांना यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानिमित्त आज अमिताभ यांनीदेखील एक खास ब्लॉग लिहिला आहे. मुख्य म्हणजे या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे. पान मसाला ब्रँड कमला पसंत सोबतचा करार त्यांनी संपुष्टात आणत असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर यासाठी घेतलेली फीदेखील ते परत करणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
‘पान मसाला ब्रँड कमला पसंद सोबत बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी जाहिराती संदर्भात करार केला होता. हा करार त्यांनी आता संपवला आहे. इतकेच नव्हे तर, त्यांच्याकडून घेतलेली फीदेखील त्यांनी परत केली आहे’, असं अमिताभ यांची त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. कमला पसंदची जाहिरात सरोगेटच्या अंतर्गत येते याची मला कल्पना नव्हती, असेही अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केलं आहे. अमिताभ यांचा सहभाग असलेल्या कमला पसंदची जाहिरात ऑन-एअर अर्थात प्रदर्शित होताच अनेकांनी विरोध दर्शवला होता.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतीच अभिनेता रणवीर सिंहसोबत कमला पसंद पान मसालाची जाहिरात केली होती. हि जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर मात्र ते सोशल मीडियार चांगलेच ट्रोल झाले. त्याबद्दल अमिताभ यांनी फेसबुकवर सूचक भाष्यदेखील केलं होतं. ‘एक घड्याळ खरेदी करून हातावर काय बांधलं, वेळ माझ्या मागेच लागली,’ असं अमिताभ यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं.
त्यांच्या या पोस्टवरदेखील अनेकांनी विविध प्रकारच्या सूचक आणि खोचक अश्या कमेंट केल्या होत्या. तर काहींनी थेट विषयाला हात घालत ‘नमस्कार सर, तुम्हा सगळ्यांना कमला पसंदची जाहिरात करण्यामागचं कारण काय? मग इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक तो काय?’, असे सवाल केले होते.