Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Happy Birthday Rinku Rajguru: ‘सैराट’च्या आर्चीने रातोरात बदललं रिंकूचं आयुष्य; 14’व्या वर्षीच गाजवली सिनेइंडस्ट्री

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 3, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Happy Birthday Rinku Rajguru
0
SHARES
17
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। Happy Birthday Rinku Rajguru सिनेइंडस्ट्रीत अनेक वर्ष नशीब आजमावूनही जो प्रकाश झोत सहज कुणाला मिळत नाही तो काही जणांच्या नशिबात आधीच लिहिलेला असतो. असच काहीस नशीब होत अभिनेत्री रिंकू राजगुरूचं.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

आज दिनांक ३ जून असून आज रिंकूचा २१ वा वाढदिवस आहे. त्यामुळे आज तिचं वाढदिवसानिमित्त रिंकू राजगुरूचं आयुष्य बदलणाऱ्या आर्चीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

मराठी सिनेसृष्टीत आघाडीच्या प्रगती पथावर कार्यरत असणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा जन्म ३ जून २००१ साली सोलापूरमधल्या अकलुज गावात झाला. आज रिंकू २१ वर्षांची झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

तिचा वाढदिवस हा मराठी सिनेसृष्टीसाठी मोठा दिवस आहे. (Happy Birthday Rinku Rajguru) कारण आजच सिनेसृष्टीला एक हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री मिळाली. जिने वयाच्या १४ व्या वर्षीच प्रेक्षकांना वेड लावलं ती पुढे काय काय करेल याचा नेम लावणंही कठीणच. तिला स्वतःलाही ठाऊक नव्हतं कि तिच्या आयुष्यात सैराटची आर्ची येईल आणि तीच आयुष्य इतक्या वेगाने बदलून जाईल.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

(Happy Birthday Rinku Rajguru) रिंकूच खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू असे आहे. याबाबत फार कमी लोकांना माहित आहे. पण तीच नाव काहीही असो लोक तिला आजही सैराटची आर्ची म्हणूनच ओळखतात.

https://www.instagram.com/p/CT6X9zQIgpR/?utm_source=ig_web_copy_link

आघाडीचे दिग्दर्शक आणि लेखक नागराज मंजुळे हे वास्तववादी कथाकार आहेत. त्यांच्या अशाच वास्तववादी सैराट या २०१६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून तिला अभिनयाची पहिली संधी मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री हि रिंकूसाठी फार मोठी झेप होती. एका सिनेमानं तीच अख्ख आयुष्य एका रात्रीत बदललं. एकदम एखाद्या चित्रपटासारखं. तिच्या पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती.

View this post on Instagram

A post shared by LW lyrical tunes🥀🙂 (@lw_lyrical_tunes)

खरतर रिंकूचा आणि चित्रपट सृष्टीचा काडीमात्र संबंध नव्हता. पण एकेवेळी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना काही कामानिमित्त सोलापूरला जावे लागले असता त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असलेल्यांमध्ये रिंकूचाही समावेश होता. (Happy Birthday Rinku Rajguru) त्यावेळी मंजुळे त्यांच्या आगामी चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते.

View this post on Instagram

A post shared by SAIRAT GALLERY (@aniljadhava)

त्यांना या पात्रासाठी ग्रामीण भागातील मुलीची आवश्यकता होती. रिंकू राजगुरुला पाहून त्यांना वाटले की, हीच ती मुलगी जिचा शोध आपण करत होतो. त्यांनी लगेच घाई करीत रिंकूचे ऑडिशन घेतले आणि तिची ‘सैराट’साठी निवड झाली. यानंतर रिंकूने सैराट मध्ये अशी काही आर्ची साकारली कि तिची छाप आजही पेक्षकांच्या मनावर कायम आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

(Happy Birthday Rinku Rajguru) आत्ता ग बया काय भैरा बीरा आहे का काय..? मराठीत सांगितलेलं कळत का तुला..? इंग्लिश मध्ये सांगू.. ओये चेन्नई एक्स्प्रेस.. आलाय साबण लावून तोंडाला काय बघतो रं.. , मी कुठं म्हनलं मला नाय आवडत.. मला बुलेट बी चालवायला आवडती…., इथून थेट शेतात चालली, एकटीच चालली बरं का! असे भन्नाट एकापेक्षा एक लक्षात राहणारे डायलॉग जेव्हा आर्ची बोलली तेव्हा या डायलॉग्सने सुद्धा इतिहास रचला. खरंच हा सैराटचा संपूर्ण काळ आर्ची आणि परश्याच्या जोडीने गाजवला. पण आर्चीने सैराटनंतर कधीच स्टॉप घेतला नाही.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

आज अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरूंच्या एक वेगळी जागा सिनेइंडट्रीत प्रस्थापित केली आहे. लोक तिच्यावर आर्ची म्हणून भरभरून प्रेम करत आहेत. अगदी तिच्या सोशल मीडियावर तिने एखादी पोस्ट शेअर केली कि तिचे चाहते आर्चीची पोस्ट म्हणून मोठ्या संख्येने लाईक करतात.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि त्यामुळे तिचा सोशल मीडिया फॉलोवर्सचा आकडा देखील फार मोठा आहे. शिवाय ती नेहमीच आपले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यावर आर्ची आली आर्ची हा डायलॉग हमखास कमेंट्समध्ये पाहायला मिळतो.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

ती १४ वर्षाची आर्ची आज २१ व्य वर्षात अतिशय सुंदर आणि मोहक दिसते. इतकेच नव्हे तर तिच्या अदांनी आणि किलर स्माईलवर अनेक तरुण फिदा आहेत. (Happy Birthday Rinku Rajguru)

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

सोशल मीडियावर वेस्टर्न आणि मॉडर्न ड्रेस घातलेली रिंकू तिच्या चाहत्यांना नेहमीच खूप आवडते. त्यामुळे रिंकू तू काहीही कर.. काहीही परिधान कर तू भारीच आहेस.. ‘सैराट’नंतर रिंकू राजगुरूने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झुंड’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण रिंकूचा सैराट जितका भावला आणि जितका लक्षात राहिला तितका आणखी कोणताच चित्रपट प्रेक्षकांनी उचलून घेतला नाही.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

मुख्य म्हणजे ज्या आर्चीवर लोक प्रेम करत होते तिच्यावर आजही त्याच भूमिकेसाठी प्रेम करत आहेत. अनेकदा सोहळ्यांमध्ये रिंकूला सैराटचा एखादा डायलॉग बोलून दाखवायला सांगितला जातोच. हे प्रेम हीच एका कलाकाराची ऊर्जा आणि प्रोत्साहन असते.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

असेच प्रेम तुला आयुष्यभर मिळो आणि तू अशीच भरभरून प्रगती कर.. आर्ची तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! मराठीत सांगितलेलं कळत नाय..? इंग्लिश मध्ये सांगू..?

हॅपी बर्थडे आर्ची..! (Happy Birthday Rinku Rajguru)

Tags: birthday specialInstagram Postrinku rajguruViral PhotosViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group