Take a fresh look at your lifestyle.

हैप्पी बर्थडे समंथा अक्किनेनी; आपल्या मोहक हास्याने चाहत्यांच्या मनावर करते राज्य

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आज आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी समंथाचे चाहते तिला सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा देत आहेत. दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आपल्या सौंदर्याने सर्वांना भूरळ पाडली आहे. सोशल मीडियावर तिच्या फॅन पेजवर तिचा वाढदिवस ३ दिवस आधीच साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. हटके अंदाज आणि पारंपरिक स्टाईल करणारी समंथा लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक आहे.

प्रत्येक लूकमध्ये समंथा नेहमीच उठून दिसते. तिने अनेक चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण आजपर्यंत तिने कधीही वेषभूषेबाबत कॉम्प्रोमाइज केले नाही. पारंपारिक साडीमध्ये ती खूप सुंदर दिसते. साडीत तिचे सौंदर्य आणखी खुलून येते. तसेच सामंथाला विविध साड्यांच्या डिझाईन आणि स्टाईलचा भलताच नाद आहे. यामुळे अनेक चित्रपटांमध्ये समंथा सध्या सुध्या ते हटके स्टायलिश साड्या परिधान करते. अगदी साडीच नव्हे तर ती विविध फॅशन ने परिपूर्ण असणाऱ्या ड्रेसेसची सुद्धा फॅन आहे. पण मुख्यत्वे पोलका डॉट्स या फॅशनच्या साड्या परिधान करणे समंथाला आवडते.

समंथा एक दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याची पत्नी आहे. नागा चैतन्य देखील दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी एक आहे. समंथा नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. कधी योग करताना व्हिडीओ पोस्ट करते. तर कधी फिरायला गेली म्हणून पोस्ट करते. सध्या ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय दिसतेय. समंथाच्या हास्याचे अनेक चाहते वेडे आहेत. तिच्या अदा पाहून चाहते नेहमीच घायाळ होतात.