Take a fresh look at your lifestyle.

Happy Birthday Sunny Leone। करणजीत कौर वोहरा सनी लिओनी कशी झाली..?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। Happy Birthday Sunny Leone आज दिनांक १३ मे असून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या पायावर उभी राहिलेली अभिनेत्री आणि डान्सर सनी लियोनी आपला ४१’वा वाढदिवस साजरा करतेय. चाळीशी झाली पण सनी आजही तितकीच सुंदर दिसतेय. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक सेलिब्रिटी म्हणून ओळख मिळवणे हा प्रवास सनीसाठी अतिशय कठीण होता. कारण आधीच्या काळात सनी एक पॉर्नस्टार म्हणून ओळखली जायची. यानंतर तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आधी आयटम सॉंग्स केले आणि यानंतर तिला प्रेक्षकांनी हळूहळू आपलंस केलं. पुढे सनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत देखील दिसली आहे. याची सुरुवात ट्रोलिंगने झाली पण आज ट्रॉलिंगइतकेच तिच्यावर प्रेम करणारे चाहते देखील मोठ्या संख्येत आहेत.

लोक या अभिनेत्रीला भले सनी लिओनी या नावाने ओळखत आहेत मात्र तीच खरं नाव करणजित कौर वोहरा असे आहे. तिचा जन्म १३ मे १९८१ साली झाला. सर्नीया- ओंटारिओ कॅनडा येथे एका शीख पंजाबी कुटुंबात तिचा जन्म झाला. सनी १३ वर्षांची असताना तिचे कुटुंब कॅलिफोर्निया येथे स्थित झाले आणि पुढील सर्व शिक्षण तिने इथेच घेतले. दरम्यान १६ व्या वर्षातच सनीचे तिच्या वर्गमित्राशी शारीरिक संबंध असल्याचे समोर आले.सनीला नेहमीच नर्स व्हायचे होते. डॉक्टरांपेक्षा तिला नर्सचे काम अधिक भावले होते. (Happy Birthday Sunny Leone)

तिने तसे शिक्षणही घेतले मात्र पुढे जाऊन तिने पॉर्न इंडस्ट्रीशी करार केला आणि तिचे नर्स होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. सनीने २०११ साली डॅनिअलसोबत लग्न केले. याआधी तिने २००२ साली पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम सुरु केले होते. दरम्यान सनीने आपल्या फियान्सेसोबतच काम करण्याची अट ठेवली होती. पॉर्न स्टारच्या यादीत सनी आजही १९व्या क्रमांकावर येते. यांनतर सनीचे कुटुंब सुटले तिला टीका सहन कराव्या लागल्या. पण मानाने जगायचा हक्क तिलाही होता.

(Happy Birthday Sunny Leone) सनी लिओनी सर्वात आधी एका खळबळजनक वक्तव्यामूळे चर्चेत आली होती. तिने बलात्कारासंदर्भात एक कमेंट केली होती आणि यामुळे तिला मोठा रोष पत्करावा लागला होता. सनीने बलात्कारासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. दरम्यान अभिनेता कमाल खान याने हे ट्वीट व्हायरल केलं होतं. सोबत त्यानं लिहिलं होतं कि, ”हे पहा, सनी लियोनी काय म्हणाली, बलात्कार एक अपराध नाही तर ते फक्त एक सरप्राइज सेक्स आहे”. यानंतर सनीने हे ट्वीट आपण केलंच नव्हतं असा दावा केला होता. शिवाय ”माझं अकाऊंट ५ मिनिटांसाठी हॅक केलं गेलं होतं, असही तिने म्हटलेलं. त्यानंतर सनीने कमाल आर खान विरोधात आपल्या ट्वीटर पेजवर बलात्कारासंदर्भात जे आपण बोललो त्याला चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली होती.

या प्रकरणानंतर सनीचं नाव सतत इंडस्ट्रीमध्ये घोळत होत. दरम्यान सनी सगळ्यात आधी बिग बॉस हाऊसमध्ये दिसली आणि त्यानंतर महेश भट्ट यांनी तिची गाठ घेतली. इथून पलटलं सनीचं नशीब. तिची पार्श्वभूमी पाहता तिला कुणीही इंडस्ट्रीत आणण्यास उत्सुक नव्हतं मात्र महेश भट्ट यांनी तिला ब्रेक दिला. दरम्यान एका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिला माध्यमांनी काही प्रश्न विचारले. (Happy Birthday Sunny Leone) दरम्यान तिला पॉर्न स्टार म्हणून अपमानित करीत असल्याचा काहींनी दावा केला होता. अशावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सनीला पाठिंबा दिला होता.

जिस्म २ या चित्रपटातून सनी पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेत्री म्हणून समोर आली. प्रेक्षकांनीही तिच्या कामाचे कौतुक केले आणि सनीचा बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणून प्रवास सुरु झाला. सनीने भले पॉर्न इंडस्ट्री सोडली असली तरीही तिने हि गोष्ट स्पष्ट केली आहे कि, तिच्या आयुष्यातील १० वर्ष भले तिने या इंडस्ट्रीत घालवली पण याचा तिला पश्चाताप नाही. ती म्हणते, मला मी केलेल्या कामाचा खेद नाही. मी पुन्हा सनी लिओनी म्हणून जन्माला आले तर मला आनंदच आहे. (Happy Birthday Sunny Leone)

करणजित सनी लिओनी कशी झाली..? (Happy Birthday Sunny Leone)

पण करणजित सनी लिओनी कशी झाली या प्रश्नाचे उत्तर द्यायचे म्हटले तर, करणजित आधी पेंटहाऊस मॅगझिनच्या बॅनरखाली सनी या नावाने काम करत होती. दरम्यान तिने यावेळी पॉर्न इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा पेंटहाऊसचे माजी मालक बॉब गिसोनी यांनी सनीसोबत लिओनचे नाव जोडले आणि करंजीत कौर वोहरा अशी सनी लिओनी झाली.