Take a fresh look at your lifestyle.

हैप्पी बर्थडे उर्मिला कानेटकर- कोठारे; एक उत्तम अभिनेत्री आणि हाडाची नृत्यांगना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे आपला ३५ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत तिने आपली ओळख निर्माण केली आहे. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवात मालिकांमधून केली. उत्तम अभिनयासह नृत्य शैलीत तिचे थिरकणारे पाय कुणीही थांबवू शकत नाही. ती एक उत्तम कथ्थक नर्तिका आहे. इतकेच नव्हे तर तिची स्वतःची ग्लोबल डान्स अकॅडेमीसुद्धा आहे. तिच्या या अकॅडमीचे नाव न्रित्याशा आहे.

उर्मिलाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यासोबत झाले. २०११ साली उर्मिला आणि आदित्यची लग्नगाठ बांधली गेली. या दाम्पत्यास ४ वर्षाची एक गोड मुलगी आहे. तिचे नाव जिजा असे आहे.उर्मिला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अनेकवेळा तिच्या गोड लेकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून आदिनाथ आणि उर्मिलाची जोडी ओळखली जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

उर्मिला एक उत्तम अभिनेत्री आहेच. पण अभिनयासोबत ती अतिशय उत्तम नृत्यांगना देखील आहे. तीने खूपच कमी वयापासून नृत्य शिकायला सुरुवात केली होती. अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ती रियाज करतानाचे व्हिडीओ शेअर करते. तिच्या अभिनयासह अनेकजण तिच्या नृत्याचे देखील चाहते आहेत. नुकताच महाराष्ट्र दिनानिमित्त तिने बुलेटराणी लूकमधील फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले होते. त्यात तिचा मराठमोळा लूक या फोटोंचे आणखीच सौन्दर्य खुलवीत होता.

अभिनेत्री उर्मिला कानेटकर – कोठारे लवकरच एकदा काय झालं या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक करणार आहे. उर्मिलाच्या मुलीच्या जन्मानंतर तिने अभिनयक्षेत्रातून काही काळाचा ब्रेक घेतला होता. पण तिच्या कमबॅकची बातमी येताच तिचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत. इतकेच नव्हे तर पुन्हा एकदा उर्मिलाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.