Take a fresh look at your lifestyle.

KBC’च्या मंचावर हरभजन सिंग आणि इरफान पठाणची हजेरी; बिग बीं’सोबत रंगला क्रिकेटचा खेळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी एंटरटेनमेंट या वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय शो म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध रियॅलिटी शो कौन बनेगा करोडपती आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. केबीसीची लोकप्रियता किती याचा अंदाज लावायचा असेल तर पर्व १३ हा याचा पुरावा आहे. या शोमध्ये अनेक विविध स्तरांवरील सेलिब्रिटी आणि अगदी सर्वसामान्य लोकदेखील सहभागी होताना दिसतात. यावेळी या मंचावर शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यांनीही हॉटसीटवर बसून बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तर जोडीने दिली. तर इतकेच नव्हे बिग बीं’सोबत क्रिकेटचा डावदेखील रंगला.

‘केबीसी’मध्ये हजेरी लावणारा प्रत्येकजण मसुवर्ण क्षण अनुभवत असतो. कारण इथे होताच इच्छा पूर्ण. जसे कि कोणताही पाहुणा असो अमिताभ यांच्याकडे काही- ना- काही फर्माइश करतोच. तसेच यावेळी हरभजन बिग बींना त्यांच्या आवाजात बंगाली गाणे ‘एकला चोलो रे’ हे गाणे ऐकायचे आहे, असे सांगितले. तर इरफानने क्रिकेटचा खेळ रानगुडे अशी फर्माईश केली. मग काय थोडीच महानायक कधी नाही म्हणाले आहेत जे याना दुखावतील. भज्जीच्या हातात बॉल, बिग बींच्या हातात बॅट आणि सूत्रसंचालनाची सूत्र इरफानच्या हाती. रंगला क्रिकेटचा खेळ. प्रेक्षकांनी बिग बींना हरभजनच्या चेंडूंवर शॉट लगावतानाही पाहिले.

यानंतर अमिताभ यांनी भज्जीची फर्माईशसुद्धा पूर्ण केली. ते म्हणाले, हे गाणे खूपच कठीण आहे. मात्र, तरीही त्यांनी बंगाली गाणे सहजतेने गायले. जे ऐकून प्रेक्षकांसोबतच हरभजन आणि इरफानही त्यांच्या गाण्याचा आनंद लूटताना दिसले. याशिवाय बिग बींनी दोन्ही क्रिकेटवीरांसोबत भांगडा केला. बिग बींनी एपिसोड दरम्यान एक सरप्राइज देत हरभजनच्या मुलीचा आणि त्याच्या पत्नीचा व्हिडिओ मेसेज दाखवला. ज्यामध्ये त्याची मुलगी हिनाया हीर त्याला जगातील सर्वात चांगले वडील सांगताना दिसते आणि त्याच्यासाठी आपले प्रेम व्यक्त करते. यानंतर भज्जीच्या भावनांचा बांध फुटला आणि त्याला रडू कोसळले. हरभजनला भूक झालेले पाहून सारा माहोल आणि खुद्द अमिताभही भावुक झाले.