Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हर हर महादेव’मध्ये हार्दिक जोशी साकारणार ‘हि’ ऐतिहासिक भूमिका; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Har Har Mahadev
0
SHARES
2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुलतानी अंधार पसरलेला असताना माता जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या झणाणत्या रणझुंजार कर्तृत्वाचे भाष्य करणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट आपल्या भेटीस येण्यास सज्ज आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाबाबत वेगळीच उत्सुकता आहे. या चित्रपटाला अत्यंत तगडी स्टारकास्ट लाभली आहे. झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटातील निष्ठावान आबाजी विश्वनाथ यांच्या भूमिकेवरून पडदा उठला आहे. या भूमिकेत मराठी अभिनेता हार्दिक जोशी आपल्याला दिसणार आहे. तसे पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

हे पोस्टर झी स्टुडिओजच्या अधिकृत पेजवर शेअर करण्यात आले आहे. हे पोस्टर शेअर करताना यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना अखेरपर्यंत साथ देणारे चतुर, धाडसी, निष्ठावान साथीदार म्हणजे आबाजी विश्वनाथ. त्यांची भूमिका साकारत आहेत अभिनेते हार्दिक जोशी. स्वराज्याचा शिवमंत्र येत्या दिवाळीत संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार,येतोय ‘हर हर महादेव’ २५ ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला.’

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा, म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच विविध भाषांतून ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स’ने केली आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावे तर त्यांच्या पत्नी महाराणी सईबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव दिसणार आहे. याशिवाय बाजीप्रभूंच्या भूमिकेत शरद केळकर आणि त्यांच्या पत्नी सोनाबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर दिसणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे.

Tags: Har Har MahadevHardeek JoshiInstagram PostMarathi Historical MovieViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group