.. त्याच्यासाठी हार्दिक जोशीची भावनिक पोस्ट; कोण आहे तो..?
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीची गाजलेली मालिका तुझ्यात जीव रंगला मध्ये राणा दा हे पात्र साकारलेला अभिनेता हार्दिक जोशी सर्वांचाच लाडका आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. शिवाय हार्दिक सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्यात अलीकडेच सेम मालिकेतील सह अभिनेत्री अक्षया देवधरसोबत त्याचा साखरपुडा झाल्यानंतर ते दोघेही पुन्हा एकदा सोशल मीडिया गाजवताना दिसत आहेत. सध्या राणा दाच्या आयुष्यात सगळं कास लवीडवी चालू आहे. असं असताना हार्दिकने एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हि भावनिक पोस्ट त्याच्यासाठी आहे.. हा तो म्हणजे कोण..? तर हा तो म्हणजे हार्दिकचा लाडका मित्र आणि पेट (पाळीव प्राणी).
हार्दिकच्या अतिशय जवळ असणारा त्याचा पेट (पाळीव प्राणी) त्याचा मित्र, दोस्त, भाऊ असा सगळं काही होता. होता म्हणायचे कारण म्हणजे आज तो हयात नाही आणि त्याला जाऊन तब्बल २ वर्षे उलटली आहेत. पण आजही हार्दिकचे त्याच्यावर अतिशय प्रेम आहे आणि त्याच्याविषयी तो आजही तितकाच भावुक होतोय. त्याच्या आठवणीतच हार्दिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या पेटसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि सोबत एक अतिशय भावनिक असे कॅप्शनही लिहिले आहे.
हार्दिकने हि पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”मिस यु बडी.. माझा भाऊ, माझा मस्तीखोर मुलगा, माझा भाऊ, माझा साथीदार.. आज तुला जाऊन दोन वर्षे झाली पण ती घटना आजच घडल्यासारखा भास होतो.” तुझी उणीव आजही आम्हाला नेहमी जाणवते. तू कायम आमच्यासोबत आहेस आणि राहणार. अशा शब्दांत व्यक्त होत हार्दिकने आपल्या भावना मांडल्या आहेत. कोणताही पाळीव प्राणी किती प्रामाणिक असतो यासाठी होंतीही विशिष्ट व्याख्या गरजेची नाही. त्यामुळे हार्दिकसाठी त्याचा बडी किती खास होता हे नक्कीच आपण समजू शकतो. त्याच्या या भावनिक पोस्टवर अक्षयानेही कमेंट केली आहे.