Take a fresh look at your lifestyle.

हार्दिक पांड्याने केलं गर्लफ्रेंडला प्रपोज..!! प्रेमाच्या इजहाराचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने त्याच्या नात्याबाबत होणाऱ्या सर्वच चर्चेला थांबा दिला आहे. हार्दिकने क्रूझमध्ये फिल्मी स्टाईलमध्ये आपली गर्लफ्रेंड नताशाला प्रपोज केले आहे. हार्दिकने त्याच्या इन्स्टाच्या अकाउंटवर साखरपुडयाची छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यात त्याने लिहिले- मैं तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्तान…. यासह, पांड्याने नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या चाहत्यांसाठी त्याने हि शुभ वार्ता दिली आहे . हार्दिक आणि नताशा खूप खुश आहेत ते त्याने पोस्ट केलेल्या छायाचित्रात दिसत आहे.

नताशा स्टॅनकोविझ एक सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि नर्तक आहे. ती सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. तिने प्रकाश झा दिग्दर्शित सत्याग्रहातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बिग बॉस (हिंदी सीझन ८) मध्ये जेव्हा ती एक महिन्यासाठी घरात होती तेव्हा तिला लोकप्रियता मिळाली.
सध्या तिच्या हार्दिक सोबतच्या नात्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.