Take a fresh look at your lifestyle.

हार्दीकचा नताशासोबत फॅमिली टाईम; ‘हे’ फोटो होतायत व्हायरल

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच यांचे प्रेम प्रकरण नेहमीच चर्चेत असते. तशातच लॉकडाउनदरम्यान नताशा आणि हार्दिक हे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी हार्दिकने इन्स्टाग्रामवरून दिली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट केले आणि गोड बातमी सांगितली. हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा हिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये नताशा गरोदर असून हार्दिकने अगदी प्रेमाने तिच्या पोटाजवळ हात धरून ते दोघे आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर नुकताच हार्दिकने एक हटके फॅमिली फोटो पोस्ट केला आहे.

हार्दिकने आपल्या इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हार्दिकच्या मांडीवर नताशाने डोकं ठेवलं आहे. या फोटोची खासियत म्हणजे या फोटोत त्यांच्या आसपास कुत्र्यांची तीन पिल्लं आहेत. या पाच जणांच्या फोटोखाली कॅप्शन लिहिताना त्याने ‘फॅमिली’ असं म्हटलं आहे. सहसा आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र असेल तेव्हा त्याला फॅमिली फोटो म्हणतात. पण हार्दिकने कुत्र्यांच्या छोटाशा कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत त्यांना आपल्या कुटुंबात स्थान दिल्याचं फोटोत दिसत आहे.

दरम्यान, नताशाने अलिकडेच तिच्या बेबीशॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सध्या लॉकडाउन असल्यामुळे या जोडीने घरच्या घरीच नताशाचं डोहाळजेवण केलं होतं. याचे काही फोटो शेअर करत, मी आणि हार्दिकने एकत्र मिळून एक मोठा प्रवास केला आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आम्ही फार आनंदित आहोत, असं कॅप्शन नताशाने फोटोंना दिलं होतं.

Comments are closed.