Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विनीनंतर शिव ठाकरे निमीच्या प्रेमात..?; स्वतःच करून दिली खऱ्या नात्याची ओळख

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shiv Thakare_Veena_Nimrit
0
SHARES
6.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदा बिग बॉसचा १६ वा सीजन तुफान गाजला. नुसता सीजन नाही तर सिजनमधील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप सोडली. या पूर्ण सिजनमध्ये पहिल्यापासून शिव ठाकरे चांगलाच चर्चेत राहिला. मंडलीचा कर्ता धर्ता अशी त्याची बिग बॉस हाऊसमधली ओळख होती. या मंडलीत उशिराने एंटर झालेली निम्रित आणि शिव यांची एकदम खास गट्टी जमली होती. ज्यामुळे बिग बॉसच्या घरात असताना शिव ठाकरे आणि निम्रित कौर अहलुवालिया यांचं नाव एकेमकांशी जोडलं गेलं. आता जेव्हा हे सगळे घराबाहेर पडले आहेत, तेव्हा शिवने स्वतःच या दोघांच्या नात्याविषयी भाष्य करत खरं काय ते उघड केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Nimrit Kaur Ahluwalia (@nimritahluwalia)

‘बिग बॉस १६’च्या दरम्यान शिव आणि निम्रित यांची जोडी चाहत्यांना चांगलीच आवडली होती. ज्यामुळे सोशल मीडियावर ‘हॅशटॅग शिव्रुत’ एकदम ट्रेंडिंगमध्ये होत. या नावाने सोशल मीडियावर काही फॅन क्लब आणि फॅन पेज देखील तयार केले गेले. यामुळे प्रश्न उपस्थित झाला कि, शिव आणि निम्रितमध्ये नक्की काय नातं आहे..? मैत्री..? का मैत्रीपेक्षा थोडं जास्त…? कि डायरेक्ट प्रेम..? भविष्यात हे एकत्र येताना दिसतील का..? असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात असताना आता शिव ठाकरेने माध्यमांसोबत बोलताना आपल्या नात्याचे गुपित उलघडले आहे.

View this post on Instagram

A post shared by shivrit (@_shivrit_forever_)

माध्यमांसोबत बोलताना शिव ठाकरे म्हणाला कि, ‘प्रेम नुसतं बोलून होत नाही. त्यासाठी हृदयात घंटा वाजली पाहिजे. माझ्या आणि निम्रितमध्ये मैत्रीचं नातं आहे. आमच्यात एक बंध आहे, जे खूप गोड आहे. हे मैत्रीचे बंधन आहे. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत. आम्ही घरात एकत्र असताना तिने माझी खूप काळजी घेतली. ही फक्त मैत्री आहे प्रेम नाही. जर माझं तिच्यावर प्रेम असतं तर ते एका बाजूला आणि जग दुसऱ्या बाजूला. मग मी त्याच्यासाठी काहीही करेन. पण सध्या तसं काही नाहीये’. असं म्हणत शिव ठाकरेने त्याच्या आणि निम्रितच्या नात्याविषयी असणारे सर्व गैरसमज दूर करत एक क्लॅरिटी दिली आहे.

Tags: Instagram PostNimrit AhluwaliaShiv ThakareVeena JagtapViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group