Take a fresh look at your lifestyle.

धोनीचा नवा लूक पाहिलात का?? Video होतोय वायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाउन काळात सर्व भारतीय खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. क्रिकेटच्या मैदानापासून दुरावलेल्या भारतीय खेळाडूंनी या काळात सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी या काळात सोशल मीडियापासून जरा दूरच होता. फार मोजके अपवाद वगळता धोनी लॉकडाउन काळात सोशल मीडियावर आला नाही. धोनी सध्या आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत रांची येथील आपल्या फार्महाऊसवर राहतो आहे.

१४ फेब्रुवारीपासून धोनीने आपलं ट्विटर अकाऊंट वापरलेलं नाही. हीच गोष्ट त्याच्या इतर सोशल मीडिया हँडलची आहे. लॉकडाउन काळात आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल याकडे धोनी लक्ष देत होता. प्रदीर्घ काळानंतर धोनीने चाहत्यांसाठी आपला नवा लूक शेअर केला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने धोनीचा नवा लूक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय.

Comments are closed.