Take a fresh look at your lifestyle.

पावनखिंड पाहिलास..? ‘झुंड’च कौतुक करण्यासाठी लाईव्ह आलेल्या जितूला नेटकऱ्याचा सवाल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली आहे. दरम्यान अनेक बड्या कलाकारांनी आणि इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी झुंडचे विशेष कौतुक केले आहे. यानंतर आता मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन झुंड आणि नागराज मंजुळेंचे कौतुक केले. दरम्यान एका नेटकऱ्याने जितूला पावनखिंड पाहिलास का? असा सवाल केला. यावर जितूनेही उत्तर टाळले नाही तर उत्तर देताना तो म्हणाला कि,  परवा गेलो होतो पण हाऊसफुल होता.

अभिनेता जितेंद्र जोशी याने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला आणि तो या कलाकृतीचे कौतुक करण्यासाठी तीन दिवसांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह आला. यावेळी त्याने नागराज यांच्या दिग्दर्शनाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं. दरम्यान प्रेक्षकांना विनंती करीत म्हणाला कि, ‘कृपया आपल्या मुलांना हा चित्रपट दाखवा’. यानंतर एका नेटकऱ्याने त्याला पावनखिंड पाहिलास का..? असा थेट प्रश्न विचारला. यावर जितूने प्रतिक्रिया देताना म्हटले कि, ‘पावनखिंड मला पहायचा आहे. मी गेल्या तीन वर्षांत पहिला सिनेमा जो थिएटरमध्ये पाहिलाय, तो म्हणजे झुंड. पावनखिंड पाहण्यासाठी परवा गेलो तर हाऊसफुल होता. मला सिनेमाची तिकिटं मिळाली नाहीत.”

दरम्यान जितेंद्रने नागराज मंजुळेना लाईव्हमध्ये सहभागी करून त्यांचे कौतुक केले. तो म्हणाला कि, ‘असा चित्रपट बनवून तू आमच्यावर उपकार करतोय. हा चित्रपट बनवताना पण तुला किती त्रास झाला, तुझं सेट पाडलं, हे सगळं मी जवळून पाहिलंय. पण चांगलं काम करत तू इथपर्यंत आला आहेत. आज मी तुझा सिनेमा पाहून तीन दिवस झाले, पण तसूभरही तो माझ्या मनातलं हलला नाही.’ या सेशनदरम्यान ‘झुंड’बद्दल एक शब्द बोलायचं झाला तर काय बोलशील असा सवाल एका एका नेटकऱ्याने विचारला असता त्यावर जितेंद्र म्हणाला, “जबरदस्त, आरसा”. नागराजचा हा चित्रपट तुम्हाला आरसा दाखवतो.