Take a fresh look at your lifestyle.

‘थार’चा ट्रेलर पाहिला का..? पहा कपूर बाप- बेट्याची अॅक्शन केमिस्ट्री 

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर ‘थार’ या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कपूर बाप बेट्यातील अॅक्शन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. त्यात नुकताच आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर इतका धमाकेदार आहे कि, नजर नहीं हटती. काय मग..? तुम्ही पाहिला का नाही ‘थार’चा अॅक्शन ट्रेलर. नसेल पहिला तर लगेच पहा.

‘थार’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून यामध्ये बेटा बाप से सवाई असे म्हणण्याजोगे चित्र दिसून येत आहे. पहिल्यांदाच हर्षवर्धनने आपले पिता अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे आणि धमाल उडवली आहे. अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांच्यासह सतीश कौशिक, फातिमा सना शेख यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ६ मे २०२२ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. दरम्यान नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर या चित्रपटाचा ट्रेलर अपलोड केला आहे.

आपण पाहू शकता कि, या ट्रेलरची सुरुवात पोलिसाच्या भूमिकेतील अनिल कपूर यांच्यापासून होते. तर सतीश कौशिक यांच्या सहाय्याने ते एका हत्येमागील रहस्याची उकल करण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर ट्रेलरमध्ये हर्षवर्धनची पहिली झलक दिसतेय. ज्यात तो डिलरच्या भूमिकेत आहे. या सीरिजच्या कथेला राजस्थानमधील एका गावाची पार्श्वभूमी बहाल करण्यात आली आहे. या चित्रपटात अँटिक डिलर असलेला हर्षवर्धन जिथे अनिल कपूर पोलीस म्हणून कार्यरत आहेत तिथे येतो आणि यानंतर ते दोघेही समोरासमोर येतात. ट्रेलरवरून लक्षात येत कि, या चित्रपटात हर्षवर्धन आपल्या वडिलांना चांगलीच टक्कर देतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज सिंह चौधरी यांनी केले आहे. शिवाय राज यांनीच चित्रपटाची कथा लिहिली असून अनुराग कश्यपने संवाद लिहिले आहेत. तर अनिल कपूर फिल्म कंपनीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.