Take a fresh look at your lifestyle.

‘हवाहवाई’; मराठी सिनेसृष्टीत हवा करायला मल्याळम सुंदरीचे ग्रँड पदार्पण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल मराठी इंडस्ट्रीची हवा काही औरच आहे. बॉलिवूड कलाकारांना तर आधीपासूनच मराठी सिनेसृष्टीची ओढ लागली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकार मराठी चित्रपटांमध्ये झळकण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. इतकेच नव्हे तर काही कलाकार अक्षरशः मराठी चित्रपटात अगदी छोटीशी भूमिका करणेदेखील पसंत करतात. आता पहा ना बोलीववूड इंडस्ट्रीचा भाईजान सुद्धा माउली चित्रपटात अगदीच लहान भूमिकेत दिसला होता. यानंतर आता दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीच्या कलाकारांना देखील मराठी सिनेसृष्टीची भूल पडल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

‘द ग्रेट इंडियन किचन’ या बहुचर्चित मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन हि मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याचे हे वृत्त हाये. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी ‘हवाहवाई’ या चित्रपटात मल्याळम अभिनेत्री निमिषा सजयन दिसणार आहे. हवहवाई हा चित्रपट येत्या १ एप्रिल २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य चित्रपट इतर भाषेत भाषांतरित होऊन प्रदर्शित होत असताना आता दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील उत्तम अभिनय करणारे कलाकार स्वतःच मराठी चित्रपटात येताना दिसत आहेत. हा नवा ट्रेंड टिळेकर यांनी ‘हवाहवाई’ सिनेमातून सुरू केला आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

याशिवाय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ८८ व्या वर्षी ‘हवाहवाई’ चित्रपटातील एक गाणे गायले आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये आणखीच विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. यानंतर आता निमिषा सजयनसारखी सशक्त अभिनेत्री या चित्रपटातून मराठीत पदार्पण करतेय म्हटल्यावर आता मराठी सिनेसृष्टीत आणखी यशस्वी पल्ल्याची भर पडणार आहे हे निश्चित झाले आहे. निमिष सजयनसह मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका असून अनेक नवीन कलाकारांनाही या चित्रपटात संधी देण्यात आली आहे