Take a fresh look at your lifestyle.

कार अपघातानंतर मलायका अरोराने दिले हेल्थ अपडेट; इंस्टा पोस्ट करीत चाहत्यांचे मानले आभार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या २ एप्रिल २०२२ रोजी एका इव्हेंटमधून मुंबईला परत येत असताना बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तिला किरकोळ दुखापत झाली होती. यानंतर तिचा बराच काळ औषधे आणि उपचारांमध्ये गेला. यानंतर आता तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता बऱ्याच दिवसांनी ती पुन्हा एकदा सोशल लाईफ जगायला लागली आहे. तीने तीच्या इंस्टाग्राम सोशल मीडियावर एक लांबलचक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तीने डॉक्टर, कुटुंब आणि इतर जे तिची काळजी घेत होते त्यांचे आभार मानले आहेत. शिवाय आपल्या तब्येतीचे अपडेट देखील दिले आहेत.

या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मलायका अरोराने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे आणि सोबत लिहिले आहे कि, ‘गेले काही दिवस आणि ज्या घटना घडल्या आहेत त्या खूपच धक्कादायक होत्या. भूतकाळात विचार करणे हे एखाद्या चित्रपटातील भयानक दृश्यासारखे वाटते आणि प्रत्यक्षात घडलेले काही नाही असंच वाटत आहे. या अपघातनंतर मला असे वाटले की एका शक्ती माझे रक्षण करत आहे. मला रुग्णालयात पोहोचण्यास मदत करणारे लोक असोत, माझे कुटुंब असो जे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि रुग्णालयातील कर्मचारी असो. माझ्या डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीत शक्य तितकी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता मला बरे वाटत आहे आणि शेवटी माझे मित्र, कुटुंब आणि माझ्या इंस्टा फॅमकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या कारचा अपघात पनवेलमध्ये झाला होता. दरम्यान ती पुण्यातील एका फॅशन इव्हेंटला हजेरी लावून मुंबईला परत येत होती. अपघात झाल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातात मलायका किरकोळ जखमी झाली होती. त्याचे झाले असे कि मलायकाच्या कार ड्रायव्हरचा तोल सुटला आणि एक्सप्रेस वेवर इतर ३ कारमध्ये धडक झाली. दरम्यान मलायकाच्या डोळ्याजवळ किरकोळ दुखापत झाली होती