Take a fresh look at your lifestyle.

वडिलांच्या निधनाने कोलमडलेली हिना खान आता कोरोनाच्या जाळ्यात; सोशल मीडियावरून दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी अडकताना दिसत आहेत. कित्येकांनी तर कोरोनाशी लढताना आपले प्राण देखील गमावले आहेत.दरम्यान आता हिना खान या अभिनेत्रीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच हिनाच्या वडिलांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले आहे. दरम्यान ती मुंबईत नव्हती. बातमी समजताच हिना मुंबईत परतली होती. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे हिना पूर्ती कोलमडली असताना हा काळ तिच्यासाठी अतिशय कठीण आहे. त्यात भरीस भर म्हणून कोरोनाचे सावंत तिच्यावर पडले.

नुकतेच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हिनाने सांगितले की ती प्रत्येक गोष्टींची काळजी घेते आहे आणि तिने कोणत्याही कठीण काळात सुरक्षित राहण्यासाठी सांगितले आहे. हिना खानने पोस्ट करत सांगितले की, माझ्या आणि कुटुंबाच्या या कठीण काळात मी कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे आणि सर्व प्रकारची काळजी घेते आहे. मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. सुरक्षित रहा आणि आपली काळजी घ्या.

हिना खानच्या वडीलांचे मागील आठवड्यात कार्डिअॅक अरेस्टमूळे निधन झाले होते. वडिलांच्या निधनावेळी ती श्रीनगरमध्ये कामानिमित्त होती. तिला हे वृत्त कळताच ती मुंबईत परतली होती. तिने तिच्या या कठीण काळात तिला व तिच्या कुटुंबाला साथ देणाऱ्या त्या सर्व लोकांचे आभार मानले. हिना तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. यामुळे त्यांचे निधन पचविणे हिनासाठी कठीण होते. मात्र ती स्वतःला आणि कुटुंबियांना सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान तिच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळताच चीनच्या चाहत्यांनी तिने स्वतःची काळजी घ्यावी अश्या समीक्षा दिल्या आहेत.