Take a fresh look at your lifestyle.

इथे कमेंट करायची गरजंच काय?; ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीच रोखठोक प्रत्युत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असते. आपले विचार आणि मतं ती सोशल मीडियावर अगदी बिनधास्त आणि रोखठोक मांडताना दिसते. सध्या हेमांगीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची जबरस्त चर्चा सुरु आहे. मराठी लेखक-निर्माता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांनीसुद्धा हेमांगीच्या या पोस्टला पाठींबा दिला आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीतील अन्य बऱ्याच कलाकारांनी हेमांगीची पाठ थोपटली आहे आणि तिचे समर्थन केले आहे. अगदी राजकीय मंडळींनी सुद्धा हेमांगीच्या विचारांचे स्वागतच केले आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सने हेमांगीच्या पोस्टचे कौतुक केले पण काही मात्र आपला ट्रोलिंगचा किडा थांबवू शकलेले नाहीत. असेच एका युजरने हेमांगीच्या पोस्टचा संदर्भ जोडून कमेंट्समधून बोट उगारले आहे आणि हेमांगीने नेहमीप्रमाणे वेळीच प्रत्युत्तर दिले आहे.

 

सोशल मीडियावर अनेकदा कोणत्याही फोटो, व्हिडीओ किंवा मुद्द्यांवरून ट्रोलिंग होते. हेमांगी कवी वेळीच सडेतोड उत्तर देत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद करताना दिसते. गेल्या काही महिन्यांपासून हेमांगी फिटनेसकडे अधिक लक्ष देतेय. दररोज नित्यनियमाने योगा आणि वर्कआऊट करताना ती दिसतेय. काही दिवसांपूर्वी हेमांगीने तिचा वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली होती. मात्र काही संकुचित मेंदू असणाऱ्या लोकांना तिचा हा अंदाज रुचला नाही. त्यामुळे या व्हिडीओवर एका चाहत्याने हेमांगीला कमेंट करत म्हटले की, ”Agree Love u r body पण लोकांना दाखवायची गरजच काय ”…या कमेंटवर हेमांगीच्या आधी तिच्या चाहत्यांनी आपापले मत कळवत कमेंट करणाऱ्याला चोख उत्तर दिले होते.

पण हेमांगीनेही त्याला सोडलं नाही. ही कमेंट वाचून हेमांगीआधी तिच्या एका चाहत्याने या युजरला रिप्लाय देत म्हटले कि, ”बघणाऱ्याच्या नजरा वाईट असतात. वाईट नजरेने पाहाल तर वाईटच दिसेल. चांगल्या नजरेने बघा प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसेल.” अशाच आशयाच्या अनेक लोकांनी या कमेंटवर एकाखाली एक अश्या कमेंन्ट केल्याचे यावर पाहायला मिळाले. यानंतर हेमांगीनेही अगदी रोखठोक शब्दात त्या युजरला रिप्लाय दिला. तिने म्हटले की, Agree तुम्हांला पटलेलं नाहीए पण इथे कमेंट करायची गरजच काय? अशा पद्धतीने आजकाल ट्रोलिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि याचा कधीकधी कलाकारांना नाहक त्रास होताना दिसतो.