Take a fresh look at your lifestyle.

कवी हूँ मैं! प्रवाहातली हेमांगी.. लोक मला हिणवायचे म्हणत झाली व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील बिंधास्त आणि बेधडक कलाकारांमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीचा समावेश होतो. विषय कोणताही असो समाज मान्य वा समाज बाह्य हेमांगी त्यावर बोलायला कधीच बाचकत नाही. यामुळे अनेकदा तिला प्रचंड ट्रोलिंगलादेखील सामोरे जावे लागले आहे. तिच्या स्पष्ट वक्तशिरपणाचा एक उत्तम ठेवा म्हणजे ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ हि पोस्ट. हि पोस्ट इतक्या मोठ्या प्रमाणात चालली कि बस्स..

हेमांगी या पोस्टमुळे एका वेगळ्याच प्रवाहात सामील झाली. यानंतर ट्रोलिंग, सकारात्मक प्रतिक्रियांवर वरचढ होणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया.. स्त्रियांसाठी बोललेल्या विषयावरून स्त्रियांनीच दिलेले टोमणे असं सगळं काही व्यक्त करताना आज हेमांगीने या प्रवाहातील हेमांगी कशी होती हे सांगितलं.

आपल्या या रोलिंग राईड प्रवासाबद्दल हेमांगी कवीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी ती विविध गोष्टींवर व्यक्त झाली. अभिनेत्री हेमांगी कवी सांगते कि, ‘लोक मला हिणवायचे. ते सगळे म्हणायचे की, तुझ्याकडे रंग नाही. तू तर कळव्यासारख्या गावी राहतेस. अगं तुझं भाषेवरसुद्धा प्रभूत्व नाही. हे ऐकत इथपर्यंत मी पोहोचले. मला वाटत हीच ती माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. कारण आपण कोणाशी स्वतःची तुलना कधीच केली नाही. कोणासोबत मुद्दामून हरवायचं म्हणून स्पर्धेत उतरले नाही. आजपर्यंत जे काही आणि जेव्हढं काही काम मिळालं ते मी केलं. इतकंच नाही तर त्या कामासाठी मी माझं शंभर टक्के योगदान दिलं.’

यानंतर पुढे बोलताना हेमांगी म्हणाली कि, ‘केवळ १५ सेकंदाची रिलही मी फार म्हणजे फार मनापासून करत असते. हि गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते. याआधी मी अनेकदा हे केलं तर ट्रोल होईन ते केलं तर ट्रोल होईन असा ट्रोलिंगचा खूप विचार करायचे. पण आता त्या ट्रोलिंगला मी काही फार महत्त्व देत नाही आणि देऊही नये असं माझं आपलं मत आहे.

कदाचित आपल्या परिचयाच्या समाजावर सोशल मीडियावर कसं वावरायचं असतं याचे काही संस्कार झालेले नाहीत. त्यामुळे मी कधीही पुढे सुद्धा ट्रोल झाले म्हणून मी माझे अकाऊंट वा कमेंट कधीच डिलिट केले नाही आणि करणार नाही.

मी अशी आहे का तर आहे आणि मी अशीच राहीन’. इतक्या बेधडकपणे हेमांगीने स्वतःची बाजू ठामपणे मांडल्यानंतर ट्रोलर्ससुद्धा तिला ट्रोल करतेवेळी किमान दहा वेळा विचार करतील अशी आशा आहे.