Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जिच्या कपाळी हळद कुंकु ती ‘माहेरवाशीण’; हेमांगीची वाचण्याजोगी पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hemangi Kavi
0
SHARES
193
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत, ज्या बिनधास्त आहेत. बेधडक आहेत. पण हेमांगी कवीची बात काही औरच आहे. विविध मालिका, चित्रपट आणि अगदी नाटक अशा तिहेरी माध्यमातून तिने प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. एक अभिनेत्री म्हणून ती उत्तम आहेच. शिवाय एक नृत्यांगना आणि लिहायच्या बाबतीतदेखील हेमांगी काही कमी नाही. विविध विषय आणि मुद्दे ती अगदी चपखलपणे आपल्या लेखणीतून उतरवते. अनेकदा ती फेसबुकवर काही ना काही पोस्ट शेअर करते. याहीवेळी तिने अशीच एक पोस्ट केली आहे जी अगदी स्त्रियांच्या मनाला साद देईल अशी आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

सध्या सोशल मीडियावर ‘टेल मी यु आर..’ असा ट्रेंड एकदम जोरोशोरोसे सुरू आहे. हेमांगीने या ट्रेंडला काहीसा वेगळाच ट्विस्ट दिला आहे आणि ‘Tell me you are माहेरवाशीण.. Without telling me you are माहेरवाशीण!’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तीने माहेरवाशीण कशी ओळखायची..? ते सांगितलं आहे. नुकतीच हेमांगी आपल्या माहेरी गेली होती आणि आईकडे मस्त आराम केल्यानंतर निघताना तिच्या कपाळावर हळदी-कुंकूची दोन बोट लावली गेली. यावरूनच हेमांगीने भावना व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये हेमांगीने लिहिले आहे कि, ‘Tell me you are माहेरवाशीण.. Without telling me you are माहेरवाशीण!” Western कपड्यांवर ही जिच्या कपाळी हळद कुंकु दिसतं तिला माहेरवाशीण समजावं!.. मुलगी,सुन ४ दिवस माहेरी/सासरी राहून आपल्या घरी निघाली की तिला हळद- कुंकू लावायचं! हे मी लहानपणापासून बघत आलेय. लहानपणी आईने घरी आलेल्या पाहुण्यांना हळद- कुंकू लावलं की आम्हांला ही लावायचं हा नियमच होता! ते काय वय नव्हतं पण लहान मुलींच्या हट्टासमोर कुणाचं काय चालतंय? म्हणून माझी आई ही लावायची. काय अप्रूप होतं काय माहीत पण मज्जा यायची. कदाचित आपण ही मोठे झालो आहोत हं, आता मला ही सगळं कळतं बरं का हे समजायची आणि दाखवण्याची हौस असावी.’

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

पुढे लिहिले आहे कि, ‘पण मुलींना एक खोड असतेच, त्यांना लवकर मोठ्ठं व्हायची घाई असते! मग कुठं आईच्या साड्या नेस, आईचं मंगळसुत्र घाल, चपला घाल, खेळात आईच हो! तेव्हा वाटायचं कध्धी एकदाचे मोठे होतोय आणि आता वाटतंय…. Yes exactly हे वाचत असताना तुम्ही मनातल्या मनात जे म्हणालात ना तेच वाटतंय. तर आता खरंच मोठं झाल्यावर त्या हळदी कुंकूचा हट्ट नाही राहीला पण तुम्ही त्याला परंपरा म्हणा, संस्कृती म्हणा किंवा अगदी लागलेली सवय म्हणा घरातून बाहेर पडताना कपाळावर लागलेले हे दोन रंग अजूनही मज्जाच आणतात.’ सध्या हेमांगीची हि पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

Tags: Facebook PostHemangi KaviInstagram PhotosMarathi Actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group