Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हेमांगी कवीने सांगितले आठवणीतले मिश्किल पट्या काका; फेसबुक पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 10, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
HemangiK
0
SHARES
32
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ९ ऑगस्ट २०२२ दिवस मंगळवार रोजी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते प्रदीप पटवर्धन याना देवाज्ञा झाली. मुंबईत गिरगावातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हार्टअटॅक निमित्त होत मात्र देवाला चांगली लोक प्रिय असतात हेच खरं. वयाच्या ६४ व्या वर्षी प्रदीप पटवर्धन यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीत निर्माण झालेली पोकळी न भरून निघणारी अशी तयार झाली आहे. याच संदर्भात व्यक्त होताना अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने आठवणीतले पट्या काका सांगितले आहेत.

हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘मी पहिल्यांदा कुठल्या अभिनेत्याला आताच्या भाषेत ‘सेलिब्रिटी’ ला पाहिलं असेल तर ते प्रदीप पटवर्धन होते. कळव्यात कुलकर्णी नावाचे डेंटिस्ट आहेत. अगदी माझ्या घराच्या किचनच्या खिडकीसमोर त्यांचं क्लिनिक. दुपारची ४ ची वेळ होती आणि माझ्या आईने चहा करत असताना उंचपुऱ्या देखण्या पुरुषाला क्लिनिकमध्ये शिरताना पाहिलं. मला आईने बोलवुन घेतलं आणि सांगितलं अगं त्या क्लिनिकमध्ये प्रदीप पटवर्धन शिरलेत बहुतेक. मी म्हटलं ह्या काही काय? एवढा मोठा माणूस इथं कशाला येईल? आई म्हणाली अगं नाही तेच आहेत. शहानिशा करायला म्हणून मी गेले क्लिनिकजवळ आणि तेवढ्यात क्लिनिकचं दार उघडून एक प्रचंड हँडसम व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर चालत आलं.’

‘पहिला अभिनेता ज्याला मी इतकं जवळून पाहिलं होतं. काळजात धस्स झालं. काय बोलावं काय करावं सुचेना. आठ नऊ वर्षाची मी त्यांना बघून घाबरून पळून आले आणि आईला सांगितलं अगं तेच आहेत!!!!! दुसऱ्या दिवशी शाळेत मी जाम शायनिंग मारली होती. मग त्यानंतर अनेक वेळा त्यांना त्या क्लिनिकमध्ये जाताना येताना पाहिलं. खूप वर्षांनी या क्षेत्रात आल्यावर त्यांच्या सोबत काम करायची संधी ही मिळाली. जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा हा किस्सा त्यांना सांगितला.’

‘मी म्हटलं ‘मी तुम्हांला पाहिलं होतं लहानपणी.’ त्यावर पट्या काका म्हणाले ‘कुणाच्या लहानपणी..?’, ‘माझ्या की तुझ्या..?’ मी म्हटलं ‘अहो माझ्या’ तर त्यांच्या विशिष्ट अशा स्टाईलमध्ये मानेला झटका देऊन ते म्हणाले ‘हां मग ठिके, मी उगाच घाबरलो!’ माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही पण घरी आल्यावर कळलं त्यांना काय म्हणायचं होतं! असा मिश्किल, हँडसम आणि टायमिंगचा बादशाह पट्या काका उर्फ प्रदीप पटवर्धन! आठशे खिडक्या नवशे दारं वरचा तुमचा डान्स म्हणजे ओहोहो!’

Tags: Facebook PostHemangi KaviMarathi ActorsPradeep Patwardhanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group