Take a fresh look at your lifestyle.

औकात में रेह.. तू भाड में गया तू भाड में रेह; हेमांगीच्या गाण्याने वेधलं तरुणाईचं लक्ष

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सक्रिय कोण आहे असा विचार केला.. तर अगदी सोप्प उत्तर म्हणजे युथ. युथ म्हणजे आजची तरुण पिढी. आजच्या तरुण पिढीचा सगळ्यात जास्त कल हा आधुनिकतेकडे असल्यामुळे सोशल मीडियावर तरुणाईने कहर केल्याचे दिसून आले आहे. सध्या एकीकडे पेटलेलं राजकारण आणि दुसरीकडे अनेकांच्या विविध प्रतिक्रिया तडगता फडगता चर्चेचा विषय ठरले आहेत. यातच आता हेमांगीने एक अशी पोस्ट केली आहे जिचा इशारा नेमका कुणाकडे आहे काही कळेनाच. पण युथसाठी मात्र हि पोस्ट अतिशय खास आणि लक्षवेधी ठरली आहे.

आठवड्याभरापासून राज्याच्या सरकारमध्ये जो राजकीय संघर्ष सुरु आहे त्याची दखल विविध माध्यमांनी घेतली आहे. अगदी राजकीय नेत्यांबरोबरच सेलिब्रेटींनीदेखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरोह वेलणकर, किरण माने, तेजस्विनी पंडित, सुमीत राघवन यांच्यासह हेमांगीचीही पोस्ट चर्चेत आली होती. प्रत्येकाने प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे सद्यस्थितीवर टीका केल्या आहेत. अशातच हेमांगीने औकात में रह बोलणारी पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. तिने थेट कोणावर टीका केली नाही. मात्र यामधून सुचक अर्थ नेटकरी काढत आहेत.

हेमांनीने एक पोस्टर शेयर केलंय. ज्यात तिचा हटके लूक दिसतोय. या पापोस्टसह तिने औकात में रेह, लातों पे आउंगी मैं तू बातों में रेह, तमीज नहीं और कदर नहीं गर तुझे, तू भाड में गया तू भाड में रेह! अशा पंक्ती लिहिल्या आहेत. याआधी फक्त औकात में रेह असं लिहीत तिने एक पोस्टर शेअर केलं होत ज्यामध्ये अनेक कलाकार होते.

त्यामुळे हेमांगीला म्हणायचंय काय..? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आज या पोस्टमधून औकात में रेह हे गाणे आहे असे तिने सांगितले आहे. लवकरच हे चिअरफूल गाणे रिलीज होणार आहे.