Take a fresh look at your lifestyle.

नवीन वर्षाच्या हेमांगीने चाहत्यांना दिल्या बोल्ड शुभेच्छा; पहा व्हिडिओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता २०२२ या नवीन वर्षानिमित्त तिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या विविध सेलिब्रिटी आपापल्या सोशल अकाउंटवरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. तेव्हा हेमांगीने देखील शुभेच्या दिल्या आहेत. 

 

https://www.instagram.com/reel/CYLc8OWBy5u/?utm_medium=copy_link

 

हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला आहे. यात तिचा बोल्ड लुक दिसत आहे. स्विमिंग पुलाजवळ तिनं हा व्हिडिओ शूट करत आपल्या चाहत्यांना तिनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने या व्हिडिओला कॅप्शनमध्ये हॅपी न्यू इअर 2022, वेलकम 2022 असं लिहून तिनं सर्वांना शुभेच्छा पाठवल्या आहेत.

नुकताच हेमांगी कवी आणि संदीप धुमाळ यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. यावेळी तिनं पतीला उद्देशून एक फेसबुक पोस्ट लिहीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.