Take a fresh look at your lifestyle.

हेमांगी करतेय Cannes Film Festivalला जाण्याची तयारी; व्हिडीओ पहाल तर हसून हसून पोटात दुखेल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी हि तिच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. कधी बेधडक वक्तव्य तर कधी विचार करायला लावणाऱ्या तिच्या पोस्टमुळे तिचा असा वैयक्तिक मोठा असा चाहता परिवार आहे. त्यात सोशल मीडियावर सक्रिय राहणे जणू तिचा छंदच! ती स्वतःच्या अदा आणि विविध फोटोंसह कॉमिक अंदाजातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. ज्यावर तिचे चाहते आणि नेटकरी भरभरून प्रतिसाद देतात. असाच एक व्हिडीओ सध्या तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती चक्क कान्स फिल्म फेस्टिव्हलची तयार करतेय.

 

 

तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अजून पहिला नसाल तर कृपया पहा. कारण हसण्याची संधी सोडाल आणि नंतर पचतावालं. या व्हिडीओमध्ये हेमांगीने ‘जेव्हा चांगला मेकअप आर्टिस्ट परवडत नाही..’ अशी हटके टॅगलाईन दिली आहे. सोबतच हातात आरसा आणि काजळ घेऊन ती उभी असलयाचे दिसतेय. मग ती अतिशय चित्र विचित्र पद्धतीने काजळ रेखाटायला सुरुवात करते. शिवाय ती आपल्या हावभावाने हे किती विद्रुप आहे असे दाखवून देते. या व्हिडीओला तिने ‘कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जाण्यासाठी मी तयारी करीत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

आता नेटकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल कि, हेमांगी कान्सची तयारी करतेय तर अशी का करतेय..? शिवाय हेमांगीने या विचित्र व्हिडिओचा संबंध कान्स फिल्म फेस्टिवलशी (cannes 2022) का जोडला असेल..? तर याच कारण आणि उत्तर दोन्हीही याच खास व्हिडिओत तिने दिलय. या व्हिडीओ मध्ये हेमांगीने एका हॉलीवूड अभिनेत्रीचा एक व्हिडीओ जोडला आहे. ज्यामध्ये तिने कान्स फेस्टिवलला असा विचित्र लुक केला होता. त्यामुळे याचा संदर्भ घेऊन हेमांगीने हा व्हिडीओ तयार केला आहे. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांना भरपूर हसवलं आहे शिवाय चांगलेच मनोरंजन केले आहे.