Take a fresh look at your lifestyle.

कुठलीही कट्टरता चूकचं; कर्नाटकातील हिजाब वादावर हेमंत ढोमेचे ट्विट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजाब घालण्यावरून सध्या जोरदार वाद सुरु आहे. या सुरू वादाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या युनिफॉर्म ड्रेस कोडचे सर्व सरकारी शाळांनी पालन करावे, असे शिक्षण विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र मुस्लिम तरुण विद्यार्थिनींना हे नियम मान्य नाहीत. हिजाब हा आमचा हक्क आहे असे म्हणत त्यांनी या नियमांना उडवून लावले आहे. तर दुसरीकडे भगवे फेटे परिधान केलेले तरुण विद्यार्थी हिजाब परीक्षण केलेल्या युवतींच्या विरोधात घोषणा देत सुटल्यामुळे हा वाद आणखीच चिघळताना दिसतो आहे. याबाबत आता मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने ट्विट केले आहे.

मराठी अभिनेता हेमंत ढोमे हा नेहमीच विविध मुद्यांवर भाष्य करत असतो. यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करताना दिसतो. हेमंतने यावेळी अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून हिजाब प्रकरणावर मत व्यक्त केले आहे. या ट्विटमध्ये हेमंतने लिहिले कि, खूप खूप वाईट दृष्य! माझ्या देशाची पुढची पिढी सुद्धा धर्म आणि जातीने विभागली जाणार आहे…या विचारानेच मन सुन्न झालंय…स्वतःच्या फायद्यासाठी या सगळ्यांच्या मनात विष कालवणारे खरे गुन्हेगार आहेत… मानवजातीचे गुन्हेगार…कट्टरता मग कुठलीही असो… कुठलीही… चुकच! अशा आशयाचे ट्विट करीत हेमंतने या संपूर्ण घटनेचा निषध व्यक्त केला आहे. सोबतच पुढील पिढीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

त्याच झालं असं कि, जानेवारी महिन्यामध्ये कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला होता. येथील एका ज्युनिअर कॉलेजमधील ६ विद्यार्थिनींना त्यांनी हिजाब परिधान केल्यामुळे शिक्षण घेण्याकरिता वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. तर ड्रेसमध्ये समानता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले होते. यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा वाद वाढत गेला. हिजाबच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी भगवी शाल आणि भगवे फेटे परिधान करून शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचताना दिसू लागले आहेत. तर हिजाब परीधान केलेल्या युवतीला कॉलेजमध्ये पाहताच या तरुणांनी अतिशय आक्रमकरीत्या जय श्री राम अश्या घोषणा दिल्या. शिवाय त्या तरुणीने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत या जमावाला प्रत्युत्तर दिले. बघता बघता हा वाद इतका चिघळला आहे कि तो काही थांबण्याचे संकेतही दिसत नाहीत आहेत. आता अशावेळी सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणे महत्वाचे ठरेल.