Take a fresh look at your lifestyle.

हो, मी मुस्लिम आहे..आणि तू आमच्या देशात द्वेष पसरवणं बंद कर; धर्मावरून ट्रोल करणाऱ्यांचा गौहरने घेतला क्लास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस’ हा एक असा शो आहे जिथे प्रत्येक सिजनमध्ये किमान एक जोडी तरी बनतेच. अशीच एक जोडी बिग बॉसच्या घरात बनली आणि बराच काळ ते दोघे एकत्र दिसल्यानंतर विभक्त झाले. हे जोडपे म्हणजे अभिनेत्री गौहर खान आणि अभिनेता कुशल टंडन. एकेकाळी गौहर आणि कुशलचं अफेअर चांगलंच गाजलं होतं. त्यामुळे आजही अनेकदा हे दोघं चर्चेत येत असतात. पण आता गौहरचं लग्न झालंय आणि ती तिच्या संसारात आनंदी आहे. पण तरीही गेल्या काही दिवसांपासून तिला कुशलवरून ट्रोल केले जात आहे. असे म्हटले जात आहे कि, कुशल आणि गौहरच्या ब्रेकअपचं कारण धर्म आहे. गौहरने कुशलवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आणि त्याने ते अमान्य केल्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले. या आरोपानंतर अखेर गौहरची सटकली आणि तिने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

गौहरने आपल्या सोशल मीडिया ट्विटर हँडलवर एक ट्विट करून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये अभिनेत्रीने लिहिले कि, ‘हे लूजर, मी मुस्लिम आहे आणि कोणीही आम्हाला आमच्या अधिकारांपासून वंचित ठेवू शकत नाही. कारण भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे लोकशाही आहे. तुला वाटते तशी हुकूमशाही इथे चालत नाही. त्यामुळे तू तुझ्या अमेरिकन स्टेट्समध्ये राहा आणि आमच्या देशात द्वेष पसरवणं बंद कर. अशा कडक शब्दांत गौहरने एका ट्रोलरचा क्लास घेतला आहे. यानंतर संबंधित ट्रोलरने ते ट्विट हाईड केले आहे.

कुशल आणि गौहर हे एकेकाळी एकमेकांसोबत सिरीयस रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉसच्या ७ व्या सिजमध्ये यांचं सूत जुळलं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बराच काळ ते एकमेकांसोबत दिसले. मात्र काही काळानंतर अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. काही कारणास्तव दोघे विभक्त झाले आणि पुढे दोघांनीही आपला मार्ग निवडून काम करणे योग्य समजले. यानंतर २५ डिसेंबर २०२० रोजी गौहर खानचा कोरिओग्राफर जैद दरबारसोबत शाही निकाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. सध्या ती तिच्या संसारात आनंदी आहे.