Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध अभिनेत्रीची शूटिंग सेटवरच प्रकृती ढासळली; तापाने फणफणली, नाकातून रक्त आलं..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 27, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Himanshi Khurana
0
SHARES
97
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस सीजन १३ फेम पंजाबी अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. अचानक प्रकृती ढासळल्यामुळे हिमांशीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माहितीनुसार, अभिनेत्री हिमांशी खुराना तिच्या आगामी पंजाबी चित्रपटाचे रोमानियामध्ये शूटिंग करत होती. जिथे मायनस ७ डिग्री सेल्सिअस तापमानात तिचे शूट सुरु होते. वातावरणाचा परिणाम थेट हिमांशीच्या प्रकृतीवर झाला आणि ती आजारी पडली. दरम्यान तिला खूप ताप होता आणि अचानक तिच्या नाकातून रक्तसुद्धा येऊ लागले.

#himanshikhurana excited for this ….but i know wht all u are going
Through in this shooting…. Giving the best show is priority for directors … Wish u all happy and healthy environment throughout this ..tough time …

Please be safe ..take proper rest and be safe pic.twitter.com/CSXPMUVPcT

— @Himanshi_khurana_kohinoor ( closed ) (@AryanOf20254281) December 27, 2022

अभिनेत्री हिमांशी खुराना सध्या परदेशात रोमानियामध्ये ‘फत्तों दे यार बडे ने’ या आगामी पंजाबी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात हिमांशी व्यतिरिक्त इंदर चहल, निशा बानू या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री हिमांशी खुरानाला आधीच ताप होता. पण चित्रपटाचे शूटिंग रखडू नये म्हणून ती शूटिंग करत होती. दरम्यान चित्रपटातील एका दृश्यासाठी तिला थंड पाण्यात शूट करायचे होते. पण तिची तब्येत आधीपासून खराब असल्यामुळे तिला आणखीच त्रास झाला. तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Himanshi Khurana 👑 (@iamhimanshikhurana)

एक मानांकित वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अभिनेत्री हिमांशी खुरानावर सध्या उपचार सुरू आहेत आणि तिला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अद्याप तिच्या तब्येतीबाबत लेटेस्ट कोणतेही अपडेट डॉक्टरांनी दिलेले नाहीत. हिमांशीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तीने रोमानियाच्या थंडीपासून बचावासाठी एकावर एक असे भरपूर कपडे परिधान केल्याचे दिसले. सोबत तिने कॅप्शनमध्ये म्हटले होते कि, ‘थंडी खूप आहे पण शूट करावे लागेल’. सोशल मीडियावर हिमांशीचे चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

 

Tags: Admitted In HospitalBigg Boss 13 Famehimanshi khuranaInstagram PostPunjabi Actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group