Take a fresh look at your lifestyle.

हिमेश रेशमियाची ‘इंडियन आयडॉल’मध्ये एंट्री …

0

चंदेरी दुनिया | संगीतकार-गायक अनु मलिकला #MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपां मुळे ‘ इंडियन आयडॉल ‘ च्या अकराव्या पर्वा चे परीक्षक पद सोडावे लागले. या कार्यक्रमात त्यांची जागा कोण घेणार याविषयीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये रंगली होती. सोनी टीव्हीने हिमेश रेशमियाची निवड करत या चर्चेला पूर्णविराम दिला . या कार्यक्रमात आता अनु मलिक यांच्या जागी संगीतकार गायक हिमेश रेशमियाची वर्णी लागल्यामुळे आता विशाल दादलानी आणि नेहा कक्कडसोबत हिमेश रेशमिया या पर्वात पाहायला मिळणार आहे.
मागील वर्षी #MeToo या मोहिमेअंतर्गत संगीतकार अनु मलिकवर गायिका सोना मोहपात्राने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. सोनाने केलेल्या आरोपांनंतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनीही तिची साथ दिली. अनु मलिकव रील या आरोपांनंतर ‘ इंडियन आयडॉल ‘ च्या दहाव्या पर्वातून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. पण अनु मलिक पुन्हा एकदा अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान , जेव्हा अनु मलिक ‘ इंडियन आयडॉल ‘ च्या अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून परतले , तेव्हा सोशल मीडियाद्वारे सोनाने पुन्हा मोहिम सुरु केली. तिच्या अनु मलिकविरोधी मोहिमेला सोशल मीडियावर अनेक महिलांचा पाठिंबा मिळाला. अखेर अनु मलिकने स्वत:तून माघार घेत हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: