रवी तेजाच्या ‘खिलाडी’चा हिंदी ट्रेलर रिलीज; फुल्ल अॅक्शन आणि कॉमेडीसाठी एकदा पहाच
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कित्येक दिवसांपासून दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता रवी तेजाचा बहुचर्चित चित्रपट खिलाडी याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नुसता रिलीज झाला नाही तर हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. त्यामुळे या ट्रेलरची चर्चा आणखीच जोरात आहे. विशेष सांगायचं म्हणजे, प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये भरपूर कमाल अॅक्शन सीन्स आणि कॉमेडीचे बहारदार सीन्स पाहायला मिळणार आहेत. शिवाय हा ट्रेलर पाहिल्यावर असंही लक्षात येईल कि धमाकेदार काहीतरी अनुभवायचं असेल तर नकीच हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रवी तेजा दिसणार असून तो नेहमीप्रमाणे त्याच्या जुन्या आणि भन्नाट स्टाईलमध्ये दिसत आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटामध्ये अॅक्शन आहे, इमोशन आहे, रोमांस आहे, सोबतच यात कॉमेडीपण आहे त्यामुळे हा चित्रपट पूर्ण एक पॅकेज आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रवी तेजाचे जबरदस्त कॉमिक टायमिंग पाहायला मिळत आहे. शिवाय त्याचा अंदाज आणि रोमँटिक स्टाइलही पाहायला मिळातेय. यात तो डिंपल हयाती आणि मीनाक्षी चौधरी या दोन अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करत असून रोमान्स करताना दिसत आहे. या चित्रपटात कमल अॅक्शन सीन्सही खूप आहेत. त्यामुळे हा चित्रपट मनोरंजाची पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश वर्मा यांनी केले असून देवी श्री प्रसाद यांचे संगीत आहे.
या चित्रपटाचे कथानक मनी माइंडेड व्यक्तीभोवती फिरते. यामध्ये कन्नड चित्रपट अभिनेता अर्जुन सर्जा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर अनसूया भारद्वाज लोकांना हसवण्यास सज्ज आहे. रवी तेजाने या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये एन्ट्री केली आहे. रवीचा ‘खिलाडी’ हा चित्रपट हिंदीतदेखील प्रदर्शित होत असल्यामुळे सर्वत्र चित्रपटाची चर्चा आहे. रवी तेजाचा हा चित्रपट हिंदी भाषेबरोबरच तेलुगु भाषेतही एकाच वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडे हिंदी प[रक्षकांचा उत्साह पाहता अनेक टॉलिवूड स्टार्स स्वतःहून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करताना दिसत आहेत.