Take a fresh look at your lifestyle.

प्रतीक्षा संपली.. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ची हिंदी आवृत्ती रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड आणि साऊथचा लाडका अभिनेता आर. माधवन याचा ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हा चित्रपट २ जुलै २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हणाले होते. यानंतर हा चित्रपट १ जुलै रोजी हिंदी सोडून अन्य भाषेत ओटीटीवर रिलीज झाला. त्यामुळे हिंदी भाषिकांचा हिरमोड झाला होता. यानंतर आता हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे हा चित्रपट हिंदीतही रिलीज झाला आहे.

अभिनेता आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चे हिंदी भाषांतर झाल्यामुळे आता हिंदी भाषिकही हा चित्रपट पाहू शकतात. या चित्रपटाची हिंदी आवृत्ती वूट सिलेक्टवर प्रदर्शित झाली असून अॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट दक्षिण भाषांमध्ये उपलब्ध आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता आर. माधवनने केले असून यातील नंबी नारायणन यांची मुख्य भूमिकादेखील त्यानेच साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची पटकथाही आर. माधवननेच लिहिली असून हा चित्रपट खास आहे.

या चित्रपटाबद्दल भावना व्यक्त करताना आर. माधवनने म्हटले कि, ‘ही एक अशी कथा आहे जी संपूर्ण जगाला दाखवण्याची गरज आहे. हे लक्षात घ्यावे की लवकरच हा चित्रपट कलर्स सिनेप्लेक्स वाहिनीवर देखील प्रसारित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. चित्रपट दोन भागात विभागला आहे. पहिल्या भागात माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनातील कामगिरी सांगितल्या आहेत. तर दुसऱ्या भागात तो षड्यंत्राचा तसेच त्याच्यावर झालेला अन्याय आणि अत्याचार दाखवण्यात आला आहे. आशा आहे कि हा चित्रपट सगळ्यांना आवडेल.’