Take a fresh look at your lifestyle.

थिएटरचा AC बंद पडला की पाडला..? नोएडात ‘द काश्मीर फाईल्स’ बंद करण्यावरून हिंदू- मुस्लिम वाद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द काश्मीर फाईल्स’ पंडितांच्या जीवनावर आधारित चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट पाहायला मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी याचे शो हाऊसफुल आहेत. अश्यातच आता चित्रपट पाहताना मध्येच बंद करण्यावरून नोएडातील एका थिएटरमध्ये हिंदू-मुस्लिम वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. चित्रपट चाली असताना अचानकपणे थांबवण्यात आल्याचं उपस्थितांच म्हणणं आहे. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. थिएटरचे मॅनेजर एजाज खान यांनी जाणिवपूर्वक चित्रपट थांबवला असा आरोप काही हिंदू संघटनानी लावला. यामुळे हा वाद झाला. दरम्यान वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रणात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

नोएडा येथील GIP मॉलमधल्या सिनेमा थिएटरमध्ये १५ मार्च २०२२ रोजी संध्याकाळच्या सुमारास हिंदू मुस्लिम वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच झालं असं कि, थिएटर प्रेक्षकांनी भरलेलं असताना ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट अचानकपणे थांबण्यात आला असं सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. थिएटरचे मॅनेजर एजाज खान यांनी जाणिवपूर्वक चित्रपट थांबवला असा आरोप काही हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे. दरम्यान वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. पुढे चित्रपट पुन्हा सुरू करण्यात आला.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या ना त्या कारणामुळे चित्रपट चर्चेत आहे. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’ अश्या घोषणा देण्यात आल्या. तसेच युपीमधील अलीगढमध्येही ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाच्या शो दरम्यान गोंधळ झाला. अलीगढच्या सीमा टॉकिजमध्ये चित्रपटाची प्रिंट खराब असल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घातला. दरम्यान वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. पुढे चित्रपट पुन्हा सुरू करण्यात आला.