Take a fresh look at your lifestyle.

हिंदुस्थानी भाऊला वांद्रे कोर्टाचा दणका; विद्यार्थी आंदोलन भडकावल्याप्रकरणी 3 दिवसांची कोठडी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदुस्थानी भाऊ याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील १० वी आणि १२ वीचे विद्यार्थी आक्रमक झाले. परिणामी या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. दरम्यान मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पाहता पाहता या आंदोलनाला हिंसक वळण आले. त्यामुळे अखेर हिंदुस्थानी भाऊला धारावी मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर आता वांद्रे न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊला ३ दिवसाची कोठडी सुनावली आहे.

दरम्यान याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ याने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले कि, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा केवळ इतकाच हेतू होता. असे म्हणून हिंदुस्थानी भाऊ याने बिनशर्त माफी मागितली आहे. मात्र वांद्रे कोर्टाच्या निर्णयानुसार आता हिंदुस्थानी भाऊ ३ दिवसाचा पोलिसी पाहुणचार घ्यावा लागणार आहे. फेब्रुवारी ४ तारखेपर्यंत हिंदुस्थानी भाऊ हा पोलीस कोठडीत असणार आहे. दरम्यान हिंदुस्थानी भाऊंच्या समर्थकांनी सोशल मीडिया दणाणून टाकत भौसाठी आपलं प्रेम आणि समर्थन दर्शविले आहे.

सध्या अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जी सोशल मीडियावर सक्रिय नाही. त्यात हिंदुस्थानी भाऊ हा स्वतः एक युट्युबर आहे. त्याची बोलण्याची आणि मुद्दे मांडण्याची शैली हि आक्रमक असली तरीही तरुणाईला वेधणारी आहे. शिवाय हिंदी बिग बॉसच्या १३ व्या सिजनमध्येही हिंदुस्थानी भाऊ झळकला होता यामुळे त्याचा चाहता वर्ग तुफान आहे.

शिवाय त्याचे फॉलोवर्स देखील मोठ्या संख्येत आहेत. यामुळे त्याचे प्रत्येक वक्तव्य तरुणाईला नशेप्रमाणे चढते. याहीवेळी असेच झाले आणि विद्यार्थी आंदोलन आक्रमक झाले. परिणामी हिंदुस्थानी भाऊची पोलीस कोठडीत पाठवणी करण्यात आली आहे.