Take a fresh look at your lifestyle.

जय हिंद दोस्तो! नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्थानी भाऊ’ची मोहित कंबोजना साथ; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सर्वाधिक गाजलेले प्रकरण म्हणजे मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरण. हे प्रकरण संपत संपत नाहीच. शिवाय यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेले NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांचे सत्र सुरु केले. दरम्यान एकही असा दिवस गेला नाही कि मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात आरोप करत काही बोलले नाहीत. इतकेच नव्हे तर भाजपा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामुळे राज्यात ड्रग्सचा धंदा चालतोय असा आरोपदेखील मलिकांनी केला. यानंतर आता नवाब मलिक आणि भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे नवे सत्र सुरु आहे. या दरम्यान प्रकरणाशी संबंधित काहीही गरज भासल्यास एक आवाज द्या मी साथ देईन असे हिंदुस्थानी भाऊ बोलतोय.

त्याच झालं असं कि, नवाब मलिक मोहित कंबोज यांच्यावर ११०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करीत आहेत. तसेच आर्यन खान अपहरण आणि वसुलीचा मास्टरमाईंड मोहित कंबोजच आहे असाही त्यांनी दावा केला. या या आरोपावर मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर देत मलिक वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा पलटवार केला. यानंतर आता या प्रकरणात हिंदुस्थानी भाऊ उतरला आहे आणि त्याने मोहित कंबोज यांच्या पाठिंब्यासाठी व्हिडीओ बनवला आहे. जो सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओत हिंदुस्थानी भाऊ म्हणतो की, मोहित कंबोज तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तुम्ही नशेडी, गंजेडी लोकांविरोधात जे आंदोलन उभं केल, जे पाऊल उचललं त्याच्या सपोर्टसाठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जेव्हा कधीही बोलावल मी प्रत्येकवेळी हजर असेन.

हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास जयराम पाठक. जन्माने मुंबईकर असणारा हिंदुस्थानी भाऊ पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी एक व्हिडीओ बनवतो आणि यानंतर एक सुप्रसिद्ध चेहरा होतो. या व्हिडीओमुळेच विकास पथक ‘हिंदुस्थानी भाऊ’ झाला. त्याचे सारेच व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसतात. रोखठोक आणि बेधडक भूमिकेसाठी त्याची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. यावरुनच त्याची बिग बॉससाठीदेखील निवड झाली होती. या कार्यक्रमातही भाऊने सर्वांना वेड लावलं होतं. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांना भाऊ नेहमीच चपराक देताना दिसतो.